जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलीचे अपहरण,गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   सिन्नर तालुक्यातील दहिवडी येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी रमेश गंगाधर कानसकर (वय-४५) यांच्या कायदेशीर रखवालीतून त्यांची वय वर्ष १७ असलेली मुलगी चासनळी येथून अज्ञात कारणासाठी अज्ञात आरोपीने अपहरण केले असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात त्यांनी दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव व सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

  

अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या अनेक गुन्ह्यांत मोठ्या शोधानंतरही त्यांचा थांगपत्ता लागत नाही.त्यातच लहान वयात घर सोडून जाण्याची कारणे अचंबित करणारी असतात.पालक रागावले किंवा प्रेमप्रकरणातूनही मुले-मुली घरातून पळून जात असल्याचे दिसून येते.मात्र १८ वर्षांखालील मुलांपेक्षा मुलींसंदर्भात अपहरणाचे गुन्हे सर्वाधिक नोंद होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी बेपत्ता झाल्यास पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो.त्यामुळे पोलिसही अशा गुन्ह्यांच्या तपासाकडे तातडीने लक्ष देऊन संबधित मुलांच्या शोधासाठी विशेष प्रयत्न करतात. घरातून बाहेर पडलेला एखादा मुलगा-मुलगी घरी परतत नाही,त्यावेळी पालकांची घालमेल अधिकच वाढते.मग, त्यांची शोधाशोध सुरू होते.तरीही ते न सापडल्यास पोलिसांकडे धाव घेतली जाते.मात्र बेपत्ता किंवा हरवलेला प्रत्येक मुलगा-मुलगी मिळेलच याची खात्री नसते.अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या अनेक गुन्ह्यांत मोठ्या शोधानंतरही त्यांचा थांगपत्ता लागत नाही.त्यातच लहान वयात घर सोडून जाण्याची कारणे अचंबित करणारी असतात.पालक रागावले किंवा प्रेमप्रकरणातूनही मुले-मुली घरातून पळून जात असल्याचे दिसून येते.मात्र १८ वर्षांखालील मुलांपेक्षा मुलींसंदर्भात अपहरणाचे गुन्हे सर्वाधिक नोंद होत असल्याची माहिती पुढे आली असल्याने पालकांच्या हृदयाची धडधड वाढताना दिसत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यात चासनळी येथे नूकतीच घडली आहे.

  या घटनेत फिर्यादी रमेश कानसकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे की,”आपली मुलगी चासनळी येथील महाविद्यालयांत दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी ०७ वाजता आपल्या दहिवडी येथील गावातून सिन्नर तालुक्यातील सीमावर्ती भागात असलेल्या कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे आली होती.मात्र ती परत  घरी परतलीच नाही.तिचा शोध घेऊनही ती मिळून आली नाही.त्यामुळे आपली खात्री झाली की ती अज्ञात इसमाने अपहरण करून फरार केली आहे.


  दरम्यान मिळलेल्या माहिती नुसार ती बारावीत शिकत होती.व रोज महाविद्यालयांत ये-जा करत होती.मात्र अपहरण झाले त्या दिवशी ती परत आलेली नाही.

   दरम्यान या प्रकरणी फिर्यादी कानसकर यांनी अज्ञात इसमाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.५९५/२०२३ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
  
    दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस हे.कॉ.एस.डी. बोटे आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.

    या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.एस.डी.बोटे हे  करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close