जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

आयुष्यमान भारत योजनेच्या अंलबजावणीचा वेग वाढवा-सूचना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


कोरोनाच्या नव्या  ‘जे.एन.-१’ व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे.हा नवा व्हेरिएंट सौम्य असला तरीही आरोग्य विभागाने आपली यंत्रणा दक्षत घेत सावध ठेवावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी एका बैठकीत दिल्या आहेत.

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना आ.काळे यांच्या हस्ते शासकीय मदतीचे धनादेश देण्यात आले.त्यावेळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते आदी दिसत आहे.

“ज्या लोकांमध्ये हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे त्यांना थंडी वाजून येते,खूप थकवा जाणवतो.ताप येण्याचीही केरळ राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला असून जेएन-१ असं या व्हेरिएंटचं नाव आहे.या घटनेनंतर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.महाराष्ट्रातही दि.२० डिसेंबर रोजी कोव्हिडचे १४ नवीन रुग्ण सापडले आहेत.

  केरळ राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला असून जेएन-१ असं या व्हेरिएंटचं नाव आहे. या घटनेनंतर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.महाराष्ट्रातही आज (२० डिसेंबर) कोव्हिडचे १४ नवीन रुग्ण सापडले आहेत.केंद्र सरकारनेही प्रत्येक राज्याला या व्हेरिएंट पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.याशिवाय संपूर्ण प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.

कोरोनाच्या जे एन १ ह्या नवीन व्हॅरीएन्टचा मागील काही दिवसांपासून देशभरात वाढत असलेल्या  प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी तहसील कार्यालयात आरोग्य विभागाची बैठक घेवून आढावा घेतला याप्रसंगी उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

  सदर प्रसंगी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर,पंचायत समिती आरोग्य अधिकारी पंडित वाघेरे, सौ.कांडेकर,रवींद्र चौधरी,माजी नगरसेवक मेहमूद सय्यद,प्रशांत वाबळे,वाल्मिक लहिरे,मनोज नरोडे,विकास बेंद्रे, महेश उदावंत,राजेंद्र आभाळे,सागर लकारे,अमोल आढाव,संतोष शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोरोनाच्या जे.एन.-१ ह्या नवीन विषाणूंचा अवतार आला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये.कोरोनाच्या पहिल्या,दुसऱ्या लाटेचा आपण यशस्वीपणे मुकाबला केलेला आहे.आरोग्य विभागाला आवश्यक असणारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे त्यामुळे नागरिकांना भीती बाळगण्याची गरज नाही.नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व गर्दीच्या ठिकाणी जाताना काळजी घ्यावी असे आवाहन केले.


   यावेळी त्यांनी कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत खरेदी करण्यात आलेल्या वैद्यकीय साहित्याचा आरोग्य अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत.यावेळी नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना आ.काळे यांच्या हस्ते शासकीय मदतीचे धनादेश देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close