गुन्हे विषयक
गजाने तरुणावर हल्ला,आठ आरोपींवर कोपरगावात गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोळपेवाडी येथील रहिवासी असलेल्या तरुणावर त्याच गावातील आठ तरुणांनी गज,दांडे,आणि काठ्या आदींच्या सहाय्याने जोरदार हल्ला चढवला असून त्यात फिर्यादी नाथू कोळपे (वय-२०) रा.कोळपेवाडी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.दरम्यान आरोपी संजू सुरेश कोळपे सह ०८ आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे कोपरगावसह सुरेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर आणि तालुक्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत आहे.मागील सप्ताहात दिपावली पाडव्याच्या दिवशी काही हद्दपार गुंडांनी गोळीबार करून पोबारा केला असताना व त्याना अद्याप अटक झाली नसताना शहर आणि तालुक्यात अन्य अनेक गुन्हे वाढले असल्याचे वारंवार सिद्ध होत असून पोलीस अधिकाऱ्यांना आता कडक भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचे दिसत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोळपेवाडी-सुरेगाव रस्त्यावर घडली असून पंधरा दिवसापूर्वीच्या मागील भांडणाच्या कारणावरून हि हाणामारी घडली आहे.
यातील फिर्यादीचा व आरोपी संजू कोळपे यांच्यात विष्णू मंदिराजवळ रितेश मच्छु कोळपे व अजय राजू कोळपे रा.कोळपेवाडी यांच्यात वाद झाला होता.त्यावेळी सदर फिर्यादी त्या ठिकाणी उपस्थित होता.मात्र तेथे उपस्थित असल्याच्या व ‘तो’ भांडणे करण्यासाठी आला या गैरसमजूतीतून झाले होते त्यात त्याच्या डोक्यात फायटरने मारले होते.मात्र त्यावेळी फिर्यादीची आई चंद्रकला व वडील नाथू यांनी संजू कोळपे याचे चुलते यांना समजावून सांगून त्यावेळी आमचे वाद मिटवले होते.
तथापि दि.२१ नोव्हेंबर रोजी दुपारी ०१.३० वाजेच्या सुमारास आपल्या मित्राचे घरी गेलो होतो व तेथून परत येत असताना दुपारी ०२ वाजेच्या सुमारास सुरेगावकडे जाणाऱ्या रोडवर पेपर मिलचे प्रवेश द्वाराजवळ आरोपी संजू कोळपे,प्रतीक उर्फ खाऱ्या मोहन कोळपे हे हातात लोखंडी गज घेऊन तर मच्छीन्द्र खन्डु कोळपे,संतोष नाना शेळके,रवी पांडू कोळपे,नवनाथ गंगा कोळपे,दुर्गेश शिंदे (पूर्ण नाव माहिती नाही),विशाल श्रावण कोळपे असे आठ जण हे आपल्या हातात लोखंडी व लाकडी दांडे घेऊन उभे असताना फिर्यादीने पाहिले होते.त्यांनी फिर्यादिस जवळ बोलावून,तुझ्यात किती दम आहे”हे आम्हाला पाहायचे आहे.तुला मारून टाकले तरी आमचे कोणीही काही वाकडे करू शकणार नाही”असे म्हणून फिर्यादीच्या दोन्ही पायाचें नडघीवर मारहाण करून जखमी केले आहे.तर हाताचे कांबीवर व पाठीवर मारहाण करून मुक्का मार देऊन नाकावर मारून जखमी केले व व वाईट-वाईट शिवीगाळ करून,”तू, गावात कसा राहतो” असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.
या प्रकरणी गांभीर्य ओळखून घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस हे.कॉ.गजानन वांढेकर आदींनी भेटी दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.५५१/२०२३ भा.द.वि.कलम १४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस हे.कॉ.वांढेकर हे करीत आहेत.