गुन्हे विषयक
… ‘त्या’ भीषण अपघातातील तीन मयत निष्पन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नगर-मनमाड महामार्गावर दि.१५ सप्टेंबर रोजी दुपारी ०३ वाजेच्या सुमारास येवल्याकडे जाणारा एक राजस्थानचा ट्रक (क्रं.आर.जे.१४ जे.एस.३४६८) व बजाज सी.टी.१०० (क्रं.एम.एच.४१ जे.२४५१) दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातातील तीन जण जागीच ठार झाले होते ते नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील रेंडाळे येथील निष्पन्न झाले असून त्याची नावे सुखदेव सीताराम मोरे (वय-२८),मनीषा सुखदेव मोरे (वय-२६),मुलगा एकुलता एक मुलगा आर्यन सुखदेव मोरे (वय-०४) अशी आहेत.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अवजड ट्रक-दुचाकी यांच्यात खिर्डी गणेश येथे झालेल्या भीषण अपघातातील तीन जण जागीच ठार झाले होते ते नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील रेंडाळे येथील निष्पन्न झाले असून त्याची नावे सुखदेव सीताराम मोरे (वय-२८),मनीषा सुखदेव मोरे (वय-२६),मुलगा एकुलता एक मुलगा आर्यन सुखदेव मोरे (वय-०४) अशी आहेत.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”शिर्डी जवळ असलेल्या सावळीविहिर फाटा ते इंदोर या राष्ट्रीय मार्गावर सध्या काम प्रगतिपथावर असून सदर रस्ता अरुंद ठरत असल्याने या महामार्गावर अपघातांची मालिका सुरु असल्याचे दिसून येत आहे.त्यात अनेक नागरिकांचा बळी जात असून वित्तीयहानी मोठ्या प्रमाणावर होत आहे.दि.१५ सप्टेंबर रोजी दुपारी ०३ वाजेच्या सुमारास झाला होता.त्यात वरील एकाच घरातील वडील,आई,आणि मुलगा असे एकावेळी ठार झाले होते.त्यामुळे या कुटुंबातील कोणीही वारस मागे राहिला नाही अशी माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल आदींनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक ताब्यात घेतला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रकचालका विरुद्ध आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याची स्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन हयगयीने चालविणे व तिघांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाटेवाल हे करत आहेत.