अर्थकारण
कोपरगावात… या बँकेत मोबाइल बँकिंग सेवा प्रारंभ

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अ.नगर जिल्ह्यातील नावाजलेल्या कोपरगाव पिपल्स बँकेने नुकतेच आपल्या ग्राहकांच्या सेवेकरिता ‘मोबाइल बँकिंग सुविधा’ मोठ्या उत्साहात सुरुवात केली आहे.
भारतातील बँकिंग क्षेत्र पुढे वाटचाल करीत आहे.बँकिंग सेवा आता मोबाइल बँकिंग मार्फत उपलब्ध आहेत,ज्यांमध्ये मुख्यतः एसएमएस आधारित शंकासमाधान व सावधानतेच्या इशार्यांचा समावेश आहे.ह्यामुळे ग्राहकास त्यांच्या बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष न जाता देखील खाते आणि खात्यातील व्यवहारांची माहिती मिळवता येते.याची सुरुवात पीपल्स बँकेने सुरु केली आहे.
ह्या सेवांसाठीचे शुल्क प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळे असते.काही बँका ही सेवा मोफत देतात तर काही वार्षिक सेवा शुल्क आकारीत आहेत.मात्र मोबाइलवर आधारित ह्या बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाने मोबाइल सेवा प्रदाता कंपनीने ग्राहकाचे निवेदन संबंधित बँकेकडे पाठविण्यासाठी लागू केलेले शुल्क भरणे गरजेचे आहे.काही बँकांनी, आपल्या मोबाइल हँडसेटमध्ये त्यांच्याकडील विशिष्ट सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन स्थापन करून, व्यक्तिगत मोबाइल बँकिंग देऊ केले आहे. मात्र ही सुविधा फक्त जी.पी.आर.एस.प्रकारच्या मोबाइल हँडसेट्सवरच चालू शकते.ही प्रक्रिया अगदी सोपी असल्याने कोपरगाव पीपल्स बँकेने आपल्या ग्रहांकासाठी हि सुविधा देऊ केली आहे.
सदर प्रसंगी लेखा परीक्षक परीक्षित भदादे,लेखा परीक्षक कौशल मुंदडा,अध्यक्ष सत्येन मुंदडा,संगणक समिती चेअरमन रविंद्र ठोळे,उपाध्यक्षा प्रतिभा शिलेदार,संचालक कैलास ठोळे,डॉ.विजय कोठारी,सुनील कंगले,कल्पेश शाह,अतुल काले,धरमचंद बागरेचा,हेमंत बोरावके,सुनील बंब,राजेंद्र शिंगी,वसंतराव आव्हाड,यशवंत आबनावे,संदीप रोहमारे,प्रभावती पांडे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक एकबोटे,गणेश काळे,सदाशिव धारणगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोपरगाव पीपल्स बॅंकेने नुकतीच नवीन संगणक प्रणाली विकसित केली असून केंद्र सरकारच्या डिजिटल धोरणानुसार आपल्या खातेदारांकरिता ही ‘डिजिटल बँकिंग सुविधा’ देण्याच्या उद्देशाने आणखी एक पाऊल पुढे टाकत ग्राहकांकरिता मोबाइल बँकिंग सुविधा सुरू केली आहे.यामुळे आपल्या मोबाइल वरुन फंड ट्रान्सफर,खाते उतारा व इतर बँकिंग सेवा मिळणार आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक संगणक विभाग प्रमुख चंद्र शेखर व्यास यांनी केले त्यावेळी त्यांनी सदर सेवेविषयी माहिती दिली व आय.एम.पी.एस,यू.पी.आय.सेवा लवकरच सुरू करीत असल्याचे नमूद केले यापूर्वी बँकेने ए.टी.एम सुविधा सुरू केलेली आहे.
तर ग्राहकांना यामुळे बँकिंग सुविधेचा फायदा होणार आहे.ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी केले आहे.खूप कमी कालावधीत आपल्या बँकेने तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव प्रगती केली असल्याचे कौतुक कैलास ठोळे यांनी केले.मोबाइल बँकिंग सुरू करण्यासाठी बी.एस.जी सॉफ्ट-वेअर व संगणक विभागाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली आहे. यावेळी आय.टी.टिम मधील सर्व सेवकांचा सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी प्रास्तविक संगणक विभाग प्रमुख चंद्र शेखर व्यास यांनी केले त्यावेळी त्यांनी सदर सेवेविषयी माहिती दिली व आय.एम.पी.एस,यू.पी.आय.सेवा लवकरच सुरू करीत असल्याचे नमूद केले यापूर्वी बँकेने ए.टी.एम सुविधा सुरू केलेली आहे.कार्यक्रमाचे सूत्र संचलन आशिश रोहमारे यांनी केले आहे.तर कार्यक्रमाच्या शेवटी निखिल निकम यांनी आभार मानले आहे.