जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

धार्मीक ग्रंथ फाडले,कोपरगाव पोलीस ठाण्यात मोठा जमाव !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील ग्रामपंचायत हद्दीत काल रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपीने सात-आठ धार्मिक ग्रंथांची पाने फाडून रस्त्यावर इतस्ततः विखरुण टाकल्याने गावात दोन गटात तणाव निर्माण झाला असून त्या ठिकाणी कोपरगाव तालुका पोलिसांनी तातडीने धाव घेऊन दोन गटात शांतता समितीची तातडीची बैठक घेऊन तणाव नियंत्रणात आणला असला तरी काही नागरिकांनी पोलीस ठाण्यावर जमाव जमून आरोपीस अटक करण्याची मागणी केल्याने पोलिसांनीं आपला काहीसा धाक दाखवून त्याना परतून लावावे लागले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

दरम्यान या मळेगाव थडीत या पूर्वी सर्वधर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने रहात असताना व कधीही असा दोन गटात वाद निर्माण झाल्याचे उदाहरण नसताना हि आक्रीत घटना घडल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.हि घटना कुणी जाणीवपूर्वक तर घडवली नाही ना अशी चर्चा होत आहे.त्यामुळे नारिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवून शांतता ठेवावी असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यानी केले आहे.

स्वीडनमध्ये काही दिवसापूर्वी काही नागरिकांचा पवित्र धर्म ग्रंथ जाळण्यात आला होता.तर स्टॉकहोमच्या मध्यवर्ती धार्मिक ठिकाणाच्या बाहेर एका व्यक्तीने धार्मिक ग्रंथाची प्रत फाडून जाळली असल्याने तणाव निर्माण झाला होता.या दहनाच्या घटनेनंतर अरब देशांमध्ये स्वीडनविरोधात संताप व्यक्त केला जात असतांना महाराष्ट्रातील अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील ग्रामपंचायत हद्दीत काल १२ नंतर ते आज सकाळी ०६ पूर्वी अज्ञात इसमाने धार्मिक ठिकाणी प्रवेश करत तेथे ठेवलेले सुमारे ८-१० धार्मिक ग्रंथातील ७-८ ग्रंथ फाडून त्याची पाने अन्यत्र विखरून टाकली असल्याची घटना आज सकाळी उघड झाली आहे.त्यामुळे एका गटातील नागरिकांनी गावात एकत्र जमत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान या प्रकरणी आयेशा मस्जिदीचे अध्यक्ष हुसेन बिबन शेख (वय-४७ )यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात इस्माविरुद्ध धार्मिक भावना दुखावणे व दोन धर्मात तेढ निर्माण करणे कामी गुन्हा क्रं.३९४/२०२३,भा.द.वि.कलम ३९५ व ३९५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान हि घटना कोपरगाव तालुका पोलिसांना समजल्यावर शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके,तालुक्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आदींनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठले होते.व दोन्ही गटांना समजावले आहे.व तातडीने दोन्ही गटांची शांतता समितीची बैठक घेऊन त्यात त्यांना समजावून सांगून आरोपीस अटक करण्याने आश्वासन दिले आहे.

दरम्यान तरीही काही ग्रामस्थ कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यासमोर आले व त्यांनी त्या ठिकाणी काही आक्षेपार्ह घोषणा दिल्याचे वृत्त आहे.मात्र त्या नंतर पोलिसांनी उग्र स्वरूप दाखवल्यावर त्यांनी तेथून काढता पाय घेतला आहे.दरम्यान त्यांनी दुपारी ३.३० नंतर पोलीस ठाण्यात जमाव जमणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यामुळे पोलीस सतर्क झाले आहे.

दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी अल्पमुदतीत सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास मोठ्या संख्येने एकत्र येत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यावर चालून जात कोणाही निरपराध कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नये ,व जो दोषी असेल त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.त्यांचे नेतृत्व कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांचेसह काही तरुण नेत्यांनी केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी आपल्या मागण्यांचे निवेदन शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना दिले आहे.त्यामध्ये मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.

दरम्यान या मळेगाव थडीत या पूर्वी सर्वधर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने रहात असताना व कधीही असा दोन गटात वाद निर्माण झाल्याचे उदाहरण नसताना हि आक्रीत घटना घडल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.हि घटना कुणी जाणीवपूर्वक तर घडवली नाही ना अशी चर्चा होत आहे.त्यामुळे नारिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवून शांतता ठेवावी असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यानी केले आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली आहे.पुढील तपास शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक देसले हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close