आरोग्य
..हे सण केवळ तीन व्यक्तींनी साजरे करा, अन्यथा कारवाई-इशारा

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील नागरिकांनी हनुमान जयंती व शब-ए बारातसाठी हिंदू व मुस्लिम बांधवांनी कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडू नये व संकटास निमंत्रण देऊ नये असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी नुकतेच एका बैठकीत केले आहे.
नागरिकांनी त्यामुळे “शब-ए-बारात”च्या दिवशी मुस्लीम धर्मीयांनी कब्रस्तानात न जाता घरातच रहावे दिल्लीतल्या निझामुद्दीन परिसरात तबलिगी जमातच्या शिबिराची जी घटना घडली तशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी.सर्वांनी आपल्या घरातच आपले धार्मिक कार्यक्रम साजरे करावे मंदिर,मस्जिद,अथवा कब्रस्तानमध्ये जाऊ नये.पूजा-अर्चा केवळ कमाल तीन व्यक्तींनी करावी बाकी नागरिकांनी ती आपल्या घरातच करावी जास्त नागरिकांनी गर्दी करू नये-पो.नि.मानगावकर
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते.ती बुधवार दि.८ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.महाराष्ट्रात हनुमानाला मारुती म्हणतात.महाराष्ट्रात शनिवार तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे.मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आहे.
तर इस्लामिक दिनदर्शिकेप्रमाणे आठवा महिना म्हणजे शबान.या महिन्याच्या चौदाव्या आणि पंधराव्या दिवसा दरम्यानची रात्र ही “शब-ए-बारात” म्हणून साजरी केली जाते. ती बुधवार दि.८ ते ९ एप्रिलच्या मध्यावर रात्री साजरी होत आहे.दक्षिण आशियात याला विशेष महत्त्व आहे.या रात्री मुस्लीम धर्मीय कब्रस्तानात जाऊन आपल्या पितरांसाठी प्रार्थना करतात त्यांच्या कबरींवर फुलं वाहतात. यानंतर ते अल्लाहची प्रार्थना करतात.यंदा ८ किंवा ९ एप्रिल या दिवशी शब-ए-बारात येईल. चंद्र दर्शनावर हे अवलंबून आहे.मात्र हे रीतीरिवाज पार पाडायला मुस्लिमांना घराबाहेर पडावं लागेल आणि कब्रस्तानात आपल्या पितरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गर्दी होण्याचीही शक्यता असतेच. दरम्यान देशभरात सध्या कोरोना विषाणूंचा कहर सुरु असून या पार्श्वभूमीवर शहरात गर्दी होऊ देणे परवडणारे नाही गर्दी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी आपल्या कार्यालयाच्या आवारात एका बैठकीचे आयोजन आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास केले होते.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,शहरातील बारा मस्जितीचे मौलाना,रियाज शेख सर,मौलाना निसार बिस्मिल्ला शेख,अड्.ए. जी.शेख,मौलाना बसिर बिस्मिल्ला,असिफ अजित पठाण,मौलाना हापीज शेख,डॉ.झाकीर शेख,मौलाना अब्दुल हमीद राही आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.या बैठकीच्या वेळी सामाजिक अंतर राखून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी,”नागरिकांनी त्यामुळे “शब-ए-बारात”च्या दिवशी मुस्लीम धर्मीयांनी कब्रस्तानात न जाता घरातच रहावे दिल्लीतल्या निझामुद्दीन परिसरात तबलिगी जमातच्या शिबिराची जी घटना घडली तशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी.सर्वांनी आपल्या घरातच आपले धार्मिक कार्यक्रम साजरे करावे मंदिर,मस्जिद,अथवा कब्रस्तानमध्ये जाऊ नये,पूजा-अर्चा केवळ कमाल तीन व्यक्तींनी करावी जास्त नागरिकांनी गर्दी करू नये हे करताना सामाजिक अंतर राखण्याचे काम आवर्जून करावे अन्यथा नाईलाजाने गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी लागेल असा इशारा पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी शेवटी दिला आहे.त्याला उपस्थितांनी सहमती दर्शवली आहे.