गुन्हे विषयक
समृद्धीवर पुन्हा एकदा अपघात,तीन ठार,कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर कोकमठाण शिवारात दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघातात आयशर टेंपो आणि क्रूझर जीपने जोरदार धडक देऊन त्यात तीन ठार व सहा जण जखमी झाले असताना आज सकाळी ११ वाजता भोजडे शिवारात समृद्धी महामार्गावर पुन्हा एक गंभीर अपघात झाला असून यात प्राध्यापक हे आपल्या गावी ईद साजरी करून आपल्या नोकरीच्या ठिकाणी जात असताना आज सकाळी ११ वाजता त्यांच्या ताब्यातील ‘वर्णा हुंडाई’ कारची (क्रं.एम.एच.०४ जे.व्ही.२३४०) समोरच्या दुभाजकावर धडकून त्यात मोहंमद जावेद एक अख्तर मोहंमद सलीमोद्दीन हे स्वतः व पत्नी शमीम बेगम महमंद जावेद अख्तर व मुलगा अरकुमुद्दीन जावेद अख्तर असे तिघे गतप्राण झाले आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांना नुकताच आपला जीव गमवावा लागला आहे.समृद्धी द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला.विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपुरहून पुण्याला जात होती.मात्र वाटेत भीषण अपघात झाला.बसमध्येच २५ जण जळून राख झाले.या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असताना आज सकाळी ११ वाजता ‘वेर्णा ह्युंडाई’ हि कार नांदेड कडून ठाण्याकडे जात असताना अपघात ग्रस्त होऊन त्यातील आई-वडील आणि मुलगा जागीच ठार झाले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा समृद्धी बाबत एक वास्तव समोर आले आहे
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर कोकमठाण शिवारात दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघातात आयशर टेंपोला पाठीमागून भरधाव वेगानं येणाऱ्या क्रूझर जीपने जोरदार धडक देऊन त्यात तीन ठार व सहा जण जखमी झाले असताना काल बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांना नुकताच आपला जीव गमवावा लागला आहे.समृद्धी द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला.विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपुरहून पुण्याला जात होती.मात्र वाटेत भीषण अपघात झाला.बसमध्येच २५ जण जळून राख झाले.या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असताना आज सकाळी पुन्हा एकदा समृद्धी बाबत एक वास्तव समोर आले आहे.या रस्त्यावर अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर व चिंताजनक वाढ झाली आहे.
अपघातानंतर पंचनामा करताना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दिसत आहे.
समृद्धी महामार्गावर गाडी चालवतांना अनेक चालक हे ‘महामार्ग संमोहनाचे’ बळी ठरले असून अपघाताच्या काही सेंकंद आदी त्याच्या मेंदूने व शरीराने जी हालचाल किंवा क्रिया करायला हवी ती वेळेत न केल्याने अपघात झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या ट्रांसपोस्टेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनात ही माहिती पुढे आली आहे मात्र त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई होणे गरजचे बनले आहे.मात्र त्या पातळवीर शुकशुकाट दिसत असून राज्यातील सरकार आपला विस्तार करण्यात व विविध पक्ष जोडण्यात मग्न आहे.अशातच आज सकाळी ११ वाजता पुन्हा एक धक्कादायक व भीषण अपघात कोपरगाव तालुक्यात भोजडे शिवारात समृद्धी महामार्गावर झाला आहे.यात मूळचे नांदेड हैदर मस्जिद जवळ देगलूर नाका येथील रहिवासी असलेले प्राध्यापक मोहंमद जावेद एक अख्तर मोहंमद सलीमोद्दीन हे आपला ईद सण साजरा करण्यासाठी ‘दोस्ती प्लॅन्ट’ नॉर्थ शिल,मुंब्रा ठाणे येथून गेले होते.व ईद साजरी करून झाल्यावर आज सकाळी जात असताना त्यांचे आपल्या वरील क्रमांकाच्या ‘ वर्णा हुंडाई’ कार वरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार भोजडे शिवारात आल्यावर कि.मी.५०८/३०० या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर जोराने आदळली व त्या अपघातात ते स्वतः व त्यांची पत्नी शमीम बेगम अख्तर व त्यांचा मुलगा आरकुमुद्दीन जावेद अख्तर आदी तीन जण दगावले आहे.
दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे,पो.हे.कॉ.राजेंद्र म्हस्के आदींनी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी आज सायंकाळी ०५ वाजता आरोपी चालक मोहंमद जावेद अख्तर यांचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसानी गुन्हा क्रं.३३८/२०२३ भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९,४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.