गुन्हे विषयक
अवैध वाळूचोरांविरुद्ध पोलिसांची कारवाई,४२.२० लाखांचा ऐवज जप्त,

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याच्या महसूल विभागाने राज्यात स्वस्त वाळू धोरण जाहीर करूनही सामान्य नागरिकांना अद्याप वाळू मिळणे दुरापास्त होत असताना काल रात्री १० वाजेच्या सुमारास अवैध वाळू चोरांविरुद्ध नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली असून यात १३ वाळूचोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्या कडील ०७ विविध ट्रॅक्टर आणि डंपर सह ४२.२० लाखांचा अवैज जप्त केल्याने वाळूचोरांत खळबळ उडाली आहे.व कोपरगाव तालुका पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती,वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले होते.०१ मे या महाराष्ट्र दिनी या धोरणाची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.त्याबाबत मोठे-मोठे ढोल बदडवले गेले होते.मात्र त्यानंतर कोणालाही तालुक्यात वाळू मिळण्याची नोंद कोपरगाव तालुक्यात दिसत नाही हे विशेष ! त्यातच महसुली अधीकारी व पोलीस आणि वाळूचोरांचे फावते आहे.
राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती,वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले होते.०१ मे या महाराष्ट्र दिनी या धोरणाची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.त्याबाबत मोठे-मोठे ढोल बदडवले गेले होते.त्याबाबत मोबाईल ॲपच्या माध्यमातून एक ब्रास वाळू ६०० रुपयांना मिळणार असे सांगितले गेले होते.सर्वसामान्यांना एका क्लिकवर मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली होती त्याची खूप प्रसिद्धी मिळवून दिली होती मात्र आज वास्तव काय आहे.तर अजूनही नागरिकांना ‘स्वस्त वाळू’ हे दिवास्वप्न ठरले आहे.अनेकांनी आपले घराचे काम थांबवले होते.मात्र आता पावसाळा सुरु होऊन जवळपास तीन आठवडे उलटले आहे.मात्र वाळू कोणाच्याही दृष्टीपथात दिसत नाही.मात्र मंत्री मात्र बढाया मारताना कंटाळत नाही हे वास्तव दिसत आहे.अशातच नागरिकांना दुर्दैवाने वाळूसाठी मिनतवारी करून वाळूचोरांच्या पाया पडावे लागत आहे.अशातच अ.नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानी व पोलिसांनी काल आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री दहा वाजेच्या सुमारास माहेगाव देशमुख शिवारातील गोदावरी नदी पात्रात वाळूचोरांविरुद्ध मोठी कारवाई करत आपला हिसका दाखवला आहे.
यात जवळपास १३ मोठे मासे गळास लावले असून हि कोपरगाव तालुक्यातील सर्वात मोठी करवाई मानली जात आहे.यातील काहींना धूम ठोकून पळून जावे लागले आहे.यातील अनेक वाळूचोर आता हप्तेखोर महसूल विभागाला डोईजड झाले आहे.त्यांनी अनेक महसुली अधिकारी आणि कर्मचारी यांना घरी पाठवले आहे तर अनेकांना कामास लावले आहे.त्यामुळे हि कारवाई यातून झाली की सरळ सेवेतून झाली हे समजायला मार्ग नाही ते काहीही असेल तरी या कारवाईचे तालुक्यात जोरदार स्वागत होत आहे.
हि कारवाई दि.२९ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास माहेगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोदावरी नदी पात्रात झाली असून ती नेहमी प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे हे विशेष ! यातील प्रमुख आरोपी करण बाळासाहेब बर्डे,(वय-२०) रा.शहाजापूर,दत्तू कोळपे (पूर्ण नाव नाही) फरार,दिलीप विलास पवार,(वय-२५) रा.कोळगाव थडी,देवराम वाल्मिक कोळपे (फरार) रा.कोळपेवाडी,किरण साहेबराव निकाळे,(वय-२५) रा.कोळगाव थडी,रामा कुंदलके (पूर्ण नाव माहिती नाही)फरार,रा.कोळपेवाडी,कृष्णा दीपक मोरे,(वय-२०)रा.सुरेगाव,आकाश मदने,पूर्ण नाव माहिती नाही (फरार),रा.कोळपेवाडी,अनिल नाथू कचारे,(वय-२८)रा.कोळपेवाडी,मिलिंद खर्डे (पूर्ण नाव माहिती नाही)फरार,रा.माहेगाव देशमुख,अक्षय किशोर मोरे (वय-१९)रा.कुंभारी,गणेश डांगे(पूर्ण नाव माहिती नाही)फरार,रा.माहेगाव देशमुख,योगेश कोळपे,फरार रा.कोळपेवाडी आदी विरुद्ध फिर्यादी पो.कॉ.रणजित पोपटराव जाधव यांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या गुन्ह्यात ०६ लाख १० हजार रुपयांचा करणं बर्डे याचा निळ्या रंगाचा स्वराज ट्रॅक्टर त्यात एक १० हजार रुपयांची एक ब्रास वाळू,तसेच ०६ लाख १० हजार रुपयांचा विलास पवार याचा निळ्या रंगाचा स्वराज ७४४ हा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर,०६ लाख किंमतीचा किरण निकाळे याचा लाल रंगाचा स्वराज ७४४ हा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर,०६ लाख रुपये किमतीचा कृष्णा मोरे याचा लाल रंगाचा स्वराज-७४४ ट्रॅक्टर,त्यात १०-१२ पाट्या वाळू,०६ लाख किंमतीचा अक्षय मोरे याचा लाल रंगाचा स्वराज ७४४ ट्रॅक्टर,०६ लाख किमतीचा योगेश कोळपे याचा निळ्या रंगाचा स्वराज ७४४ हा ट्रॅक्टर असा एकूण ४२ लाख २० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील अवैध वाळूचोरांत खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा नोंद क्रं.३३३/२०२३ भा.द.वि.कलम ३७९,३४,भारतीय संरक्षण अधिनियम कलम ३/१५ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जी.एस.वांढेकर हे करत आहे.