गुन्हे विषयक
मुलीसोबत बोलल्याच्या कारणावरून मारहाण,दोन जखमी,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजीनगर येथील रहिवासी असलेला आरोपी रणजित श्रीपत इंगळे हा फिर्यादीच्या महिलेच्या मुलीशी बोलल्याच्या कारणावरून त्याच्याशी जाबसाल केल्याने त्याचा त्यास राग येऊन त्याने आपल्या अन्य सहकाऱ्यांना बोलावून फिर्यादी महिला व तिच्या अन्य नातेवाईकांना मारहाण करून विशाल उत्तम मकवान व रोहित बाळासाहेब मकवान यांना जखमी केले असल्याचा गुन्हा फिर्यादी महिला छाया बाळासाहेब मकवाल (वय-३८) हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
बुधवार दि.२१ जून रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर आरोपी आला होता.व तो फिर्यादी महिलेच्या मुलीशी बोलला असता याबाबत मूलीच्या आईने त्यास जाबसाल केला होता.याचा राग येऊन त्याने त्याचे अन्य सहकाऱ्यांना सोबत बोलावून आणून फिर्यादी महिलेच्या घरासमोर आले व त्यांनी लाकडी काठीने फिर्यादी महिलेचा दिर विशाल उत्तम मकवान मुलगा रोहित बाळासाहेब मकवान यांना दमदाटी करून काठीने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला छाया मकवान हि दहिगाव बोलका येथील रहिवासी असून त्यांच्या नजीक प्रमुख रणजित इंगळे हा आरोपी आपल्या कुटूंबासॊबत राहतो.बुधवार दि.२१ जून रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर आरोपी आला होता.व तो फिर्यादी महिलेच्या मुलीशी बोलला होता याबाबत मूलीच्या आईने त्यास जाबसाल केला होता.याचा राग येऊन त्याने त्याचे अन्य सहकारी बाबूलाल भाऊसिंग इंगळे,आकाश बाबूलाल इंगळे,अजय श्रीपत इंगळे आदींना सोबत बोलावून आणून फिर्यादी महिलेच्या घरासमोर आले व त्यांनी लाकडी काठीने फिर्यादी महिलेचा दिर विशाल उत्तम मकवान मुलगा रोहित बाळासाहेब मकवान यांना काठीने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादी महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३१६/२०२३ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे वरील चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.निजाम शेख हे करीत आहेत.