गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात चोरी,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील बोलकी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले शेतकरी रवींद्र दशरथ ढगे (वय-३५)यांच्या कांद्याच्या चाळीत बांधून ठेवलेले १७ हजार रुपये किमतीचे दोन शेळ्या व एक बोकड अज्ञात चोरट्यांनीं चोरून नेले असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने बोलकी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील वाढत्या चोऱ्यासंबंधी राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आहे.मात्र अद्याप तरी त्याचे सकारात्मक परिणाम समोर आलेले नाही.नाही म्हणायला तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी वासुदेव देसले यांनी दरोड्यासह विविध गुन्ह्यात अनेक वर्षा पासून फरार असलेले अनेक गुन्हेगार जेरबंद केले असल्याची खात्रीलायक व दिलासादायक बातमी आज हाती आली आहे.
कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळात झाला आहे.दुचाकी,चारचाकी चोऱ्यासह अन्य भुरट्या चोऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना शांतचित्त झोप अशक्य झाली आहे.या संबंधी राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आहे.मात्र अद्याप तरी त्याचे सकारात्मक परिणाम समोर आलेले नाही.नाही म्हणायला तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी वासुदेव देसले यांनी दरोड्यासह विविध गुन्ह्यात अनेक वर्षा पासून फरार असलेले अनेक गुन्हेगार जेरबंद केले असल्याची खात्रीलायक व दिलासादायक बातमी आज हाती आली आहे.तो तेवढा दिलासा दिसून येत असताना मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास बोलकी येथील शेतकरी रवींद्र ढगे यांच्या कांद्याच्या चाळीत बांधून ठेवलेले १७ हजार रुपये किमतीचे दोन शेळ्या आणि एक बोकड अज्ञात चोरट्याने आपल्या आर्थिक फायद्यासाठी माध्यरात्री चोरून नेले आहे.या प्रकरणी त्यांनी आज सकाळी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३२२/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.निजाम शेख हे करीत आहेत.