गुन्हे विषयक
महिलेचा विनयभंग,शाळेतील शिक्षकाचा प्रताप,कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने आपल्याच नात्यातील एका महिलेचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून या प्रकरणी सदर महिलेंने (वय-२६) तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदर महिला हि शुक्रवार दि.१६ जून रोजी दुपारी ३.३० वाजता आपल्या मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला आणण्यासाठी शाळेत गेली असता तेथील शिक्षकाने,”तुला कोणाचा आधार नाही,तुझे मुलांचे शिक्षण मी करतो,तुला घर बांधून देतो, तुला नवरा नाही तर तुला माझे सोबत राहायला काय अडचण आहे ? “तुला शाळेतील किराणा फुकट देतो,एक रात्र तू माझे सोबत अ.नगर येथे चल,तू,मला खूप आवडते” असे म्हणून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि मजुरी करणारी असून तिच्या पतीचे निधन झालेले आहे.तिची मुले हि जिल्हा परिषद शाळेत शिकत असून सदर महिलेचा मुलगा हा उत्तीर्ण झाल्याने तीला त्यास पुढील शिक्षणासाठी अन्य शाळेत प्रवेश घ्यायचा होता त्यामुळे सदर महिला हि शुक्रवार दि.१६ जून रोजी दुपारी ३.३० वाजता आपल्या मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला आणण्यासाठी शाळेत गेली असता तेथील शिक्षकाने,”तुला कोणाचा आधार नाही,तुझे मुलांचे शिक्षण मी करतो,तुला घर बांधून देतो,तुला नवरा नाही तर तुला माझे सोबत राहायला काय अडचण आहे ? “तुला शाळेतील किराणा फुकट देतो,एक रात्र तू माझे सोबत अ.नगर येथे चल,तू,मला खूप आवडते” असे म्हणून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.तिने सदर आरोपी शिक्षकास मी,माझे मुलांस भक्कम आहे” असे म्हणाल्याचा राग येऊन आरोपी शिक्षकाने सदर महिलेस मी,तुला संपवून टाकील”तुला कोणाला काय सांगायचे ते सांग,माझे तू काही वाकडे करू शकत नाही” असा सज्जड दम भरला व दमदाटी केली आहे.
दरम्यान या प्रकरणी सदर महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी आरोपी शिक्षक याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व सहाय्यक फौजदार संदीप वांढेकर आदींनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी महिलेचा जबाब नोंदवून गुन्हा क्रं.३०५/२०२३ भा.द.वि.कलम ३५४,५०९,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस फौजदार वांढेकर हे करीत आहेत.