आरोग्य
कोपरगाव तालुक्यात मोफत सर्वरोग निदान शिबिर संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमान धावपळीच्या युगात माणसांना आपल्या आरोग्यकडे लक्ष देता येत नाही हे वैषम्य असून आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी मोफत सर्वरोग निदान शिबिर उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी नुकतेच केले आहे.
“आपण स्वतःचे आरोग्य जपले तरच आपण आपले कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकतो म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घेवून निरोगी व तंदुरुस्त रहावे”-पुष्पाताई काळे,अध्यक्ष,प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ,कोपरगाव.
कोपरगाव येथील प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व सुप्रसाध हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कोळपेवाडी येथे मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित केले आहे.त्या वेळी त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी सुप्रसाध हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रकाश कोळपे,सुरेखा कोळपे,डॉ.धनंजय कोळपे,डॉ.गंगासागर कोळपे, डॉ.राजश्री कोळपे,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा वैशाली आभाळे,सरपंच चंद्रकला कोळपे,डॉ.आय.के.सय्यद,डॉ.प्रीती देसाई,डॉ.मेहेरबान सिंग,डॉ.आशिष जऱ्हाड,राजश्री पारचे,सुनिता कोळपे,गणेश पारचे,सागर कोळपे आदींसह रुग्ण उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि,”आपण स्वतःचे आरोग्य जपले तरच आपण आपले कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकतो म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घेवून निरोगी व तंदुरुस्त रहावे असे पुष्पाताई काळे यांनी यावेळी सांगितले.
सदर प्रसंगी प्रास्तविक डॉ.प्रकाश कोळपे यांनी केले तर सूत्रसंचालन सुरेखा कोळपे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा वैशाली आभाळे यांनी मानले आहे.