आरोग्य
…या नगरपरिषद कर्मचाऱ्यांना केले गणवेश वाटप
संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)राज्यात व देशात कोरोना विषाणूची साथ पसरल्याने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने तातडीची पावले उचलली असून सफाई कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेच्या वतीने प्रत्येकी नुकतेच दोन दोन गणवेश देण्यात आले असल्याची नमहिती कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या गणवेशावर नगरपरिषदेचे नांवही छापलेले आहे.संचारबंदीच्या काळात असे गणवेश आवश्यकच आहेत.कोपरगाव नगरपरिषद आरोग्य विभागाचे व घनकचरा ठेकेदाराचे मिळून २०० सफाई कर्मचारी आहेत.तथापि काही जनहितेशी राजकीय नेत्यांनी मात्र सामाजिक संकेत स्थळावर व वृत्तपत्रांत ३००-३५० सफाई कर्मचारी माजी आ. कोल्हे यांचे नाव न घेता असे धादांत चुकीचे छापून आले असल्याचा आरोप केला आहे.मर्यादित सफाई कर्मचारी असूनही व कोपरगाव शहराचा व्याप वाढलेला असतांनाही नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी शहराचे आरोग्य चांगले ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात.शासनानेही ते मान्य केले असून पालिकेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.त्यात या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार अध्यक्ष विजय वहाडणे यांनी काढले आहे.