जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार-…या संघटनेकडून स्वागत

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ.नगर जिल्हा शेतकरी संघटनेची बैठक राज्य उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नूकतीच पार पडली असून यात राज्य सरकारने बाजार समिती निवडणुकीत तींवर्ष शेतमाल पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना मातदानाचा अधिकार दिला असल्याच्या निर्णयाचे अभिनंदन केले आहे.

“मुख्यमंत्री शिंदे सरकारने नगरपरिषदांचे नगराध्यक्ष,सरपंच व बाजार समितीमध्ये थेट मतदानाचा अधिकार जनतेला व शेतकऱ्यांना दिला हा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने घोडे बाजार रोखण्याचा दृष्टीने चांगला निर्णय असून असाच निर्णय जिल्हा बँकेत सोसायटी सभासदांना मतदानाचा अधिकार देणे बाबद घ्यावा”-अनिल औताडे,जिल्हाध्यक्ष,शेतकरी संघटना.

महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना पुन्हा मतदान करता येणार आहे.या बाबतचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांणी जाहीर केला आहे.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने मागे घेतलेले चार निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने पुन्हा अमलात आणण्याचे ठरवले आहे.हि शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब असून याबाबत शेतकरी संघटनेने सरकारच्या या निर्णयाचे श्रीरामपूर येथील बैठकीत स्वागत केले आहे.

सदर प्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,तालुका अध्यक्ष युवराज जगताप,गोविंदनाना वाघ,संजय वमने,हरिभाऊ तुवर,कैलास पवार,इंद्रभान चोरमल,शरद पवार,कडू पवार,नारायण पवार,किशोर पाटील,ऍड.कापसे,ऍड.घोडे,ऍड.थोरात,विष्णुपंत खंडागळे,दादासाहेब आदिक,सुदामराव औताडे, आप्पासाहेब आदिक,शरद आसने,दिलीप औताडे,मनोज औताडे,भाकचंद औताडे,कैलास पवार आदी पदाधिकाऱ्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना अड्.काळे म्हणाले की,”निवडून आल्यानंतर दिलेली आश्वासने पाळली नाहीत.खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदा,जिल्हा बँका,पंचायत समित्या व बाजार समित्या ह्या संस्था शेतकऱ्याच्या असून सदर संस्थेवर शेतकरी प्रतिनिधीच असायला हवेत.परंतु घराणेशाही राजकारणाने या बाबादची व्याख्याच बदलली असून जो आमदार,खासदार,मंत्री तेच जिल्हा बँकेवर साखर कारखान्यावर त्याच्याच कुटूंबातील सदस्य जिल्हा परिषदेवर,पंचायत समिती सह बाजार समितीवर असल्यामुळे शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात शोषण होत आहे.राजकीय पक्षाही विचारधारेचे राजकारण न करता मोठया प्रमाणात तडजोडीचे राजकारण करत असल्याने आयाराम गयाराम नेत्याची संख्या वाढलेली आहे.आज रोजी सत्ता व सत्तेतून पैसा हेच समीकरण राजकीय पक्ष व पक्षातील नेत्याचे झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्याच्या हित रक्षणार्थ शेतकरी संघटना येथून पुढे संस्थाच्या निवडणूका लढविणार असल्याची माहिती अड्.काळे यांनी शेवटी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close