जाहिरात-9423439946
आरोग्य

सावळीविहिर गावात अन्य रोगांचाही प्रादुर्भाव !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

सावळीविहिर-(प्रतिनिधी)

सध्या कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये किंवा वाढू नये म्हणून देशात, राज्यात सर्वत्र लॉक डाऊन असल्याने सर्व ठप्प आहे.सावळीविहीर व परिसरातही लॉक डाऊन मुळे सर्व बंद असून लोक आपापल्या घरात आहेत मात्र सध्या कधी कडकडून ऊन तर कधी ढगाळ वातावरण किंवा पाऊस असे वातावरण होत असून त्यामुळे सावळीविहीर परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे व त्यामुळे मलेरिया, डेंगू थंडी ताप असे आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, त्यामुळे या परिसरात जंत नाशक फवारणी आरोग्य विभागाने करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे

सध्या सावळीविहीर व परिसरात कोरोना मुळे लॉकडाऊन असून अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद आहेत तसेच जमावबंदी आदेश असल्याने लोक आपापल्या घरात आहेत, मात्र घरामध्ये सध्याचे वातावरण बघता व ढगाळ वातावरणामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.या डासांमुळे डेंगू, मलेरिया, थंडी ताप आदी आजार मोठ्या प्रमाणात होत असून या आजाराचे रुग्ण सध्या या परिसरात वाढले आहेत.

कोरोनो विषाणूमुळे होणारा आजार व त्याची सर्वत्र चर्चा असल्याने ग्रामस्थ दवाखान्यात भीतीपोटी जाण्याचे टाळत आहेत, मात्र आरोग्य विभागाने किंवा येथील सरकारी आरोग्य केंद्राने याकडे लक्ष देऊन कोरोना विषाणूंमुळे होणाऱ्या रोगाची व इतर मलेरिया, थंडी-ताप या रोगाची लक्षणे यांची माहिती येथील नागरिकांना पुरवणे गरजेचे आहे.तसेच येथे प्रथम जंतुनाशक फवारणी करावी व परिसरात पाऊस झाल्याने गावाला होणारा पाणीपुरवठाही शुद्ध असावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे कोराेना या विषाणू संसर्गाची माहिती अजूनही ही वाड्या-वस्त्यांवर अशिक्षित अशा लोकांपर्यंत पोहोचली गेली नाही किंवा या संबंधी अनेकांना योग्य व अधिक माहिती नाही त्यामुळे अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करताना आढळतात.त्यासाठी येथील आरोग्य केंद्राने योग्य पद्धतीने या आजाराविषयी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे व सावळीविहीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दिवसा प्रमाणे रात्रीही सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांसह येथे सज्ज ठेवण्याची गरज आहे. तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार त्वरित सावळीविहीर ग्रामपंचायतीने सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक,कामगार तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य अधिकारी, गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना सदस्य म्हणून घेतलेले आहे.कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने गावात इतर देशातून, इतर राज्यातून, किंवा इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची नोंद तसेच जनजागृती करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने कोरोनो आजाराविषयी फलक लावून जनजागृती करावी.अत्यावश्यक सेवा करणारे व गरजू अशा नागरिकांसाठी मोफत मास्क पुरवावीत.आपल्या दवाखान्यातील कर्मचारी या काळात तत्पर असावेत यासाठी प्रयत्न करावेत तसेच सावळीविहीर व परिसरात बाहेरच्या देशांमधून आलेले, इतर राज्यातून आलेल्या नागरिकांची नोंद घेऊन त्यांची कोरोनो तपासणी केली जावी.काही लोक येथे चीन, सौदी अरेबिया आदी देशातून आलेले आहेत. त्यांची चौकशी अजूनही झालेली नाही म्हणून त्यांची चौकशी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत विभागाने करणे गरजेचे आहे ,अशी मागणी कल्याण-डोंबिवलीचे काँग्रेसचे अध्यक्ष मामा पगारे यांनीही केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close