जाहिरात-9423439946
आरोग्य

वैद्यकीय साधनांचा अभाव असताना,जिल्हाधिकाऱ्यांचे उपचाराचे आदेश !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रातिनिधी)

वैद्यकामध्ये रोगनिदान, रोगाच्या स्थानाचे, स्थितीचे व विस्ताराचे अचूक मापन आणि उपचार यांसाठी अनेक प्रकारच्या उपकरणांचा उपयोग हि बाब अत्यंत महत्वाची मानली जात असताना व त्याचा जिल्ह्यात पूर्ण अभाव असताना जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना या विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व खाजगी रुग्णालये चालू करण्याचे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.आधी या उपकरणांची तरतूद करा मगच असे आदेश काढावे अशी मागणी कोपरगाव डॉक्टर असोसिएशनने आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.

वैद्यकीय व्यावसायिकाच्या स्वत:च्या शारीरिक कौशल्याची आणि ज्ञानेंद्रियांच्या उपयुक्ततेची कक्षा वाढविणारी साधीसाधी आणि आज नित्योपयोगी वाटणारी अनेक उपकरणे गेल्या सुमारे तीन हजार वर्षांत शोधली गेली आहेत.सुश्रुतांच्या शल्य चिकित्साशास्त्रात जवळजवळ १२० उपकरणे शरीराच्या बाहेरून किंवा आतून वापरण्यासाठी उपलब्ध होती असे दिसते. आज लाखो उपकरणे असताना कोरोना विषाणू तपासणीचे किट नसताना या रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांना यात लोटणे कितपत शहाणपणाचे आहे हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान आमच्या प्रतिनिधीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचेशी भ्रमंध्वनिवरून संपर्क साधला असता त्यांनी तो उचलला नाही.तहसीलदार योगेश चंद्रे यांचेशी संपर्क साधला असता त्यानी अशी सरकारकडून कुठलीही अद्याप तरतूद नाही.प्राथमिक साधने पुरेशी असतात मात्र आम्हालाही तशी सोय नाही खाजगी रुग्णालयांना तशी साधने हवी असतील तर त्यांच्या संघटनेने सरकारकडे आपली मागणी नोंदवावी-योगेश चंद्रे,तहसीलदार कोपरगाव.

वैद्यक शास्रामध्ये मध्ये रोगनिदान, रोगाच्या स्थानाचे, स्थितीचे व विस्ताराचे अचूक मापन आणि उपचार यांसाठी अनेक प्रकारच्या उपकरणांचा उपयोग सतत वाढत आहे. भौतिकीच्या प्रगत ज्ञानावर आधारित नवीन तंत्रे अशा उपकरणांच्या मदतीने गेल्या दोन-तीन शतकांत वापरात येऊ लागली. त्यामुळे वैद्यकीय कौशल्यामधील अचूकपणा वाढू लागला; तसेच वेळेची बचत होऊन वैद्यकीय सेवेचा फायदा कमी वेळात अधिक रुग्णांना देणे शक्य होऊ लागले. या प्रक्रियेमध्ये वैद्यकीय विज्ञान जास्त वस्तुनिष्ठ होत असले, तरीही आरोग्यविषयक सेवा अधिक खर्चिक होत आहे, असा आक्षेप अनेकदा घेतला जातो. तिचे यांत्रिकीकरण होत आहे.वर्तमानात देशभरात व राज्यात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे.देशात ६४९ जणांना या विषाणूची लागण झाली असून १३ जणांचा त्यात मृत्यू झाला आहे तर ४२ जणांना वाचविण्यात सरकारी आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती आहे.तथापि नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्वच खाजगी रुग्णालयांना आपल्या सेवा सुरु करण्याचे आदेश काढल्याने वैद्यकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.कारण या खाजगी रुग्णालयांना अद्याप उपचार करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक साहित्यच उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.अशा स्थितीत सरकारी असो किंवा खाजगी वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी उपचार कसे करायचे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.कारण एक मीटरच्या आत हा विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो हा सरकारी यंत्रणांचाच दावा आहे.अशा स्थितीत उपचार करणाऱ्या डॉक्टरला रुग्ण हा नेमका कोणत्या आजाराचा आहे हे कशाच्या आधारावर समजणार ? समजेपर्यंत अनेकांना त्या विषाणूची लागण होणारच नाही याची हमी कोण घेणार हा गंभीर प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.त्यामुळे सरकारला खाजगी रुग्णालयांची उपचार करावे असे सरकारला वाटत असेल तर त्या रुग्णाला तपासायचे साहित्य आधी उपलब्ध करू द्यावे लागतील उगीच खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टर व तात्यांच्या कर्मचाऱ्यांना संकटात टाकणे शहाणपणाचे ठरणार नाही असा दावा काही डॉक्टर यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे.आणि तो रास्त मानला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.

या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मयूर जोर्वेकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आपले रुग्णालय असेही चालू असून अशी वैयक्तिक संरक्षक संसाधने (पी.पी.टी.) साधने असतील तर जोखीम नक्कीच कमी होईल असे सांगितले आहे.व अशी साधने मिळावी अशी मागणी केली आहे.

वैद्यकीय व्यावसायिकाच्या स्वत:च्या शारीरिक कौशल्याची आणि ज्ञानेंद्रियांच्या उपयुक्ततेची कक्षा वाढविणारी साधीसाधी आणि आज नित्योपयोगी वाटणारी अनेक उपकरणे गेल्या सुमारे तीन हजार वर्षांत शोधली गेली आहेत.सुश्रुतांच्या शल्य चिकित्साशास्त्रात जवळजवळ १२० उपकरणे शरीराच्या बाहेरून किंवा आतून वापरण्यासाठी उपलब्ध होती असे दिसते. आज लाखो उपकरणे असताना कोरोना विषाणू तपासणीचे किट नसताना या रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांना यात लोटणे कितपत शहाणपणाचे आहे हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close