आरोग्य
पूर्व भागात गोंधळी नागरिकांना पोलिसानी दिला प्रसाद !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे व कोपरगाव ग्रामीण भागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशाने बिट हवालदार संजय पवार,कॉन्स्टेबल दीपक ठाकरे,व यांच्या सहकाऱ्यांनी बंद परिस्थितीचा आढावा घेतला असता.गावातील काही लोक निष्काळजी पणाने रस्त्यावर दुकानांसमोर घोळका करून बसलेले आढळले असता दांड्याने चांगलाच प्रसाद वाटप करण्यात आला आहे.
राज्यात कोरोना विषाणूने कहर केला आहे.राज्यात जवळपास ११० नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे व कोपरगाव ग्रामीण भागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशाने बिट हवालदार संजय पवार,कॉन्स्टेबल दीपक ठाकरे,व यांच्या सहकाऱ्यांनी बंद परिस्थितीचा आढावा घेतला असता.गावातील काही लोक निष्काळजी पणाने रस्त्यावर दुकानांसमोर घोळका करून बसलेले आढळले असता दांड्याने चांगलाच प्रसाद वाटप करण्यात आला आहे.शिरसगाव -सावळगाव ग्रुप ग्रामपंचायती तर्फे गावात गल्लोगल्ली जंतुनाशक फवारणी करण्यात आली. उपसरपंच इरफान पटेल, ग्रामसेवक संग्राम बोर्डे, सदस्य कैलास मढवे, पोलीस पाटील विलास जाधव यांनी पोलिस प्रशासनास वेळोवेळी सहकार्य केले.गावात बाहेरून येणाऱ्यांचाही नावे दहेगाव आरोग्य विभागाकडे पाठवली आहे.जास्तीत जास्त २५ ते ३० जण आढळून आल्याने त्यांना दहेगाव आरोग्य केंद्रात तपासणी करण्याचे सांगण्यात आले आहे.बाहेरील गावातून येणाऱ्यांना गावात येण्यास सबंधी घातली आहे.विचारपूस करूनच गावात सोडण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी कोरोनाचा विषाणूची जन जागृती केली व आसपासच्या गावात बाहेरून येणाऱ्यांची आपल्या गावी येणाऱ्यांची नावे ग्रामसेवकाने दहेगाव आरोग्य केंद्रात कळवावी संबधित ग्रामसेवकाने नोंद करावी असे आवाहन करण्यात आले आहे.