जाहिरात-9423439946
आरोग्य

दुबई वारी करून ३९ जण कोपरगावात !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आपली दुबई वारी करून ३९ नागरिक परत आले असून त्यातील चार जण संशयित होते त्यांची योग्य ती तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल सामान्य आले आहेत त्यांच्या पासून कोणताही धोका नसल्याची माहिती कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

वर्तमानात चिनी विषाणू कोरोनाचा जनतेने भलताच धसका घेतला असून त्यापासून जगभरात खळबळ उडाली आहे.इटली,चीन,दक्षिण कोरिया या देशात सर्वाधिक बळी गेले असून शेजारी पाकिस्तान मध्येही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव असल्याने समजते.त्या तुलनेने भारताने जगाच्या तुलनेत योग्य वेळी व चांगली खबरदारी घेतली असल्याने जगभरात कौतुक होत आहे.

वर्तमानात चिनी विषाणू कोरोनाचा जनतेने भलताच धसका घेतला असून त्यापासून जगभरात खळबळ उडाली आहे.इटली,चीन,दक्षिण कोरिया या देशात सर्वाधिक बळी गेले असून शेजारी पाकिस्तान मध्येही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव असल्याने समजते.त्या तुलनेने भारताने जगाच्या तुलनेत योग्य वेळी व चांगली खबरदारी घेतली असल्याने जगभरात कौतुक होत आहे.या विषाणूवर अद्याप उपाय सापडला नसल्याने खरी चिंता आहे.त्याला कोपरगाव शहरही अपवाद नाही.कोपरगावात या बाबत जनजागृती मोठ्या प्रमाणावर प्रशासनाने केली आहे.त्यात कोपरगाव पंचायत समिती,कोपरगाव नगरपरिषद,ग्रामीण रुग्णालय,कोपरगावचे तहसीलदार आदींचा समावेश आहे.तरीही प्रसार माध्यमे व सामाजिक संकेत स्थळे हि वर्तमानातील जागृत देवस्थाने बनल्याने जनतेचा या अशाश्वत देवस्थानावर अधिक विश्वास असल्याचे दिसते.प्रशासन योग्य मार्गदर्शन करत असतानाही अफवा येतातच कशा असा प्रश्न प्रशासनाच्या मनात तयार झाला आहे.

कोपरगाव शहरात ३९ नागरिक पर्यटनास गेले होते.त्यातील कोपरगावात आल्यावर चार जण संशयित होते त्यांच्या तपासणीसाठी नगर येथील ग्रामीण रुग्णालयांत अहवाल तयार करून मिळण्यासाठी पाठवले होते.मात्र त्यात संशयित नाही.संबंधित नागरिक वेळेपूर्वी आल्याने त्यांच्यात अशी कोणतीही व्यक्ती आढळली नाही.कि ज्याला कोरोनाची लागण झालेली आहे.त्यामुळे नागरिकांनी उगीच भीती बाळगू नये.या कोरोना बाबत नागरिकांनी फक्त काळजी घेणे गरजेचे आहे.कोणालाही सर्दी,पडसे,खोकला,ताप असेल तर त्या व्यक्तीची तपासणी करून घ्यावी.तशा व्यक्ती कोणाला आढळल्यास आरोग्य कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येतील मात्र अशा नागरिकांची सत्वर नोंदणी करावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी संतोष विधाते यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close