जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

माणसाची जीवनशैली आरोग्यास कारणीभूत – डॉ.पाटील

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

प्रत्येक मानवाच्या आत असलेल्या पिंडातील म्हणजेच मुत्रपिंडातील पाणी म्हणजेच स्वमुत्र होय. हे सर्व व्याधींवर गुणकारी आहे. परंतु आजपर्यंत याबद्दल समाजात गैरसमजच जास्त पसरविले गेले असून ते आरोग्यासाठी सर्वाधिक गुणकारी आहे.मात्र आज माणसाची जीवन शैलीच आज त्याच्या आरोग्यास हानिकारक बनली असल्याचे प्रतिपादन पुणे येथील शिवांबु तज्ज्ञ डॉ,नितीन पाटील यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्था आणि तेजज्ञान फौंडेशन पुणे, कोपरगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात आरोग्याच्या नव्या वाटा या विषयाच्या अनुषंगाने शिवांबु चिकित्सक डॉ.नितीन पाटील यांनी नुकतेच मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे सचिव सुधीर डागा, प्रसिद्ध योग प्रशिक्षक उत्तमभाई शहा, डॉ.सुभाष पाटणकर आदीं प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,शिव म्हणजे शंकर आणि आंबू म्हणजे पाणी साक्षात शंकराने पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगतांना याबद्दल उल्लेख केला आहे. तसेच प्रत्येक धर्माच्या ग्रंथातही याचा उल्लेख आहे याचे अनेक पुराव्यानिशी दाखले देत जनजागृतीची व सहजसाध्य, गुणकारी असलेली, कष्टासाध्य आजार नष्ट करणारी ही उपचार पद्धती प्रत्येकाने अंगीकारून आपले जीवन आरोग्य संपन्न करावे .प्रत्येक मानवाच्या आत असलेल्या पिंडातील म्हणजेच मुत्रपिंडातील पाणी म्हणजेच स्वमुत्र होय.ज्या प्रमाणे पाण्याच्या टाकीतील पाणी ती भरल्या नंतर बाहेर पडले जाते त्या प्रमाणेच रक्तातील घटकांचे योग्य ते प्रमाण राखण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त झालेले घटक मूत्राद्वारे बाहेर टाकले जातात परंतु ते शरीराच्या गरजेचे असतात. या चिकित्सेने सर्दी, खोकल्यापासून ते कॅन्सर सारखा रोगीसुद्धा बरा झाल्याचे व आरोग्य संपन्न जीवन जगत असल्याचे सांगून आजच्या धावपळीच्या जीवनात अनैसर्गिक जीवनशैली अंगीकारल्यामुळेच मानव व्याधीग्रस्त बनत चालला आहे. सध्याच्या काळात जी औषधे हदयरोग व इतर औषधात वापरली जातात ती मानवी मुत्राच्या अर्कापासून तयार केले जातात व अत्यंत महागात विकली जात असल्याचा दावा केला आहे.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु.रीना पाटील यांनी करून दिला तर उपस्थितांचा सत्कार योगशिक्षक उत्तमभाई शहा यांचे शुभ हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.रीना पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी कोपरगाव शाखेचे डॉ.सुभाष पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र भवर, वृंदा कोऱ्हाळकर यांच्यासह समता पतसंस्थेचे कर्मचारी आणि तेजज्ञान फौंडेशनचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार वृंदा कोऱ्हाळकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close