आरोग्य
कोपरगावात कोरोना रुग्णास उतार !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)
राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ४६६ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०६ रुग्ण बाधित आढळले असून ४६० निरंक आढळले आहे.तर नगर येथे ५१० स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत २३ तर अँटीजन तपासणीत ०६ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०० असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण ११ रुग्ण या मोठ्या विश्रांतीनंतर पहिल्यांदा बाधित आढळले आहे.तर २३ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहर व तालुक्यात एकाचाही मृत्यू नोंदवला गेला नाही.तथापि कोरोना रुग्णांत नैऋत्येकडील गावात मोठी रुग्णवाढ झाली असून त्यात जवळके येथील रुग्ण सर्वाधिक आहे हि वाढ लक्षणीयरीत्या मानली जात आहे.दरम्यान आज एकही रुग्णाचे निधन झाले नाही.
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १३ हजार ७३९ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १५८ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१५ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५६ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ५८ हजार ३५० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०६ लाख ६३ हजार ४०० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०८.६८ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १३ हजार ३६६ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.२९ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख ०९ हजार १९२ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०५ हजार ४४१ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ९७ हजार २१२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ५३८ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.लग्न,दहावे,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण बऱ्याच अंशी पुन्हा वाढु लागले आहेत. कोपरगाव तालुक्यातील काकडी,मल्हारवाडी,डांगेवाडी,पोहेगाव,मनेगाव,जवळके आदी ठिकाणी रुग्ण लक्षणीयरित्या वाढले आहे हि चिंतेची बाब आहे.याबाबत प्रशासनाला तातडीने पावले उचलावी लागतील अशी चिन्हे आहेत.त्या दृष्टीने आरोग्य विभागाने हालचाली सुरु केल्या असून घरोघरी तपासणी मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे.या मोहिमेत शिक्षकांना सामील करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.घोलप यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.