आरोग्य
कोपरगावात आता “विशेष” मानांकनासाठी “शहर स्वच्छता अभियानाने” घेतला वेग
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-( प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात कोपरगांव शहरास कचरा मुक्त शहर व 5 स्टार रेटींग मानांकन प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातून नगरपरिषदेमार्फत विविध उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला आहे.
शहर स्वच्छ अभियान हे भारताच्या ४,००० हून अधिक शहरांच्या, रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने सुरु केलेला राष्ट्रीय पातळीवर अभियान आहे. हे अभियान २ ऑक्टोबर २०१४ रोजी राजघाट, नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरु केले. त्यांनी स्वत: रस्त्याला स्वच्छ केले. मोदी म्हणाले,”महात्मा गांधींना सर्वात मोठे स्मारक म्हणजे २०१९ मध्ये त्यांच्या १५० व्या जयंतीला त्यांची स्वच्छ भारताची इच्छा साध्य करणे होय. हे भारताच्या स्वच्छतेसाठी सर्वात मोठे अभियान आहे.
देशाच्या या सर्वात मोठ्या अभियानात ३० लक्षाहून अधिक सरकारी कर्मचारी व शाळा, महाविद्यालयातील मुलांनी भाग घेतला आहे.विशेष म्हणजे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात राबविले जाते आहे.स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) हे पेयजल व स्वछता मंत्रालयांमार्फत व स्वच्छ भारत अभियान (शहरी) हे शहर विकास मंत्रालयमार्फत राबविले जात आहे .२ ऑक्टोबर २०१४ ला ग्रामीण भागासाठी निर्मल भारत अभियानाची पुर्नरचना करून स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) सुरु करण्यात आले . तर शहरी भागात ते संपूर्णपणे नव्याने सुरु करण्यात आले आहे .
कोपरगाव नगरपरिषदेने यात सहभाग नोंदवून त्याची चमक दाखवली आहे.त्यानुसार दि. २२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर रोजी शहरातील पद्मा मेहता प्राथमिक विद्यालय, नगरपालिका शाळा क्र.१, मौलाना उर्दू स्कुल, नगरपालिका शाळा क्र.३, गीता प्रशाला येथे चित्रकला, रांगोळी, निबंध इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक बंदीची शपथ देण्यात येवून प्लास्टिक हटवा देश वाचवा, प्लास्टिकची पिशवी नको, कापडी पिशवी वापरा असा संदेश देत शहरातील मुख्य मार्गावरून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वच्छता श्रमदान देखील केले. यात विद्यार्थ्यांना मुख्याधापक व इतर सर्व शिक्षकांनी प्लास्टिक बंदी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
कोपरगांव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपाध्यक्ष योगेश बागुल,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आरोग्य सभापती अनिल आव्हाड यांच्या मार्गदर्शना खाली जिओकॉन कन्स्लटन्सी पुणे यांच्याकडून भुषण वडांगळे, कमलेश दाभाडे, करण सपकाळे, विजय भालेराव हे विविध कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत.