आरोग्य
कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार ९७६ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १५२ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१० जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६२ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख २१ हजार २४५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०४ लाख ८४ हजार ९८० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १०.७० टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार ६१४ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.२१ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ८१ हजार ४६९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार ८४२ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ७० हजार ५२७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ०९९ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.कोरोनाचा वर्तमानात डेल्टा प्लस हा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत असून गोव्यात व कोकण मराठवाड्याच्या काही भागात विक्रमी रुग्ण आढळले आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला असून पुन्हा एकदा निर्बंध व शनिवार रविवार बंद ठेवला आहे.व अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी सात ते दुपारी चार पर्यंतच आपली दुकाने सुरु ठेवता येत आहे.डेल्टा प्लसने उचल खाल्ली असून राज्य शासन हादरले आहे.कोरोना रुग्ण काही अंशी पुन्हा वाढु लागले आहे.त्यामुळे काळजी घेणे गरजेचे बनले आहे.तर काही भागात तरुण आपले वाढदिवस भर रस्त्यात करून कोरोना साथीला निमंत्रण देताना दिसत आहे.तर राजकीय नेत्यांनी कथनी करणीला अंतर देत आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पद वितरण समारंभ सुरु केल्याने चिंता वाढली असून त्यातून रुग्ण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.त्यातच शहर पोलिसांनी आता कडक धोरण अवलंबण्याची गरज निर्माण झाली आहे.