आरोग्य
बालकांच्या उज्वल भविष्यासाठी कोरोनाला हरविणे गरजेचे-डॉ.उज्वला शिरसाठ
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोनाचा कालखंड अनेकांना वेदनादायी ठरला आहे हे वास्तव स्वीकारून आगामी काळात लहानग्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक कोरोना साथीला हरवू असा विश्वास कोपरगाव येथील बालरोग तज्ञ डॉ.उज्वला शिरसाठ यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केला आहे.
भारतासह अन्य देशात आगामी कोरोनाचा तिसरी लाट लहान बालकांसाठी त्रासदायक ठरणार असल्याचे भाकीत अनेक जागतिक आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने शासन सावध झाले असून त्यांनी बालरोग तज्ज्ञांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचे काम सुरू केले आहे.त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव तहसील कार्यालयात एक शिबीर संपन्न झाले.
भारतासह अन्य देशात आगामी कोरोनाचा तिसरी लाट लहान बालकांसाठी त्रासदायक ठरणार असल्याचे भाकीत अनेक जागतिक आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने शासन सावध झाले असून त्यांनी बालरोग तज्ज्ञांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचे काम सुरू केले आहे.त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव तहसील कार्यालयात एक शिबीर संपन्न झाले त्यावेळी उपस्थित तज्ज्ञांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
या प्रसंगी तहसिलदार योगेश चंद्रे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर,बालरोग टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ.अजेय गर्जे,डॉ.मयुर जोर्वेकर,डॉ.आतिष काळे, डॉ.शंतनू सरवार,डॉ.प्रियंका मुळे,शहरी आरोग्य अभियानच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.गायत्री कांडेकर, डॉ.पुजा बोर्डे,डॉ.विकास घोलप,डॉ.साहिल खोत, डॉ.नितीन बडदे,डॉ.सुजित सोनवणे,डॉ.आसेफा पठाण, डॉ.वरद गर्जे,डॉ.कुणाल घायतडकर,डॉ.कृष्णाजी पवार,डॉ.अरुणा गाताडे,डॉ.सुवर्णा काळे,डॉ.वर्षा लिंपणे, डॉ.संजिवनी तोडकर,डॉ.संकेत पोटे,डॉ.आदित्य पाटील, डॉ.आयुब शेख,डॉ.सुधीर वाणी,डॉ.नेहा वाघमारे, डॉ.बाळासाहेब आडसरे,डॉ.संतोष तिरमखे यांचे सह समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
तहसिलदार यांचे कार्यालयात डॉ.उज्वला शिरसाठ-ढाकणे यांनी चलचित्र फितीचा वापर करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तहसिलदार योगेश चंद्रे यांनी कार्यशाळेच्या मार्गदर्शिका बालरोग तज्ज्ञ डॉ.उज्वला शिरसाठ व सहभागी सर्वांचे स्वागत केले.प्रास्ताविक ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. फुलसौंदर यांनी तर टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ.अजेय गर्जे यांनी मनोगत व्यक्त केले.तर आभार विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाल बडदे यांनी मानले.तर सुत्रसंचलन समन्वयक सुशांत घोडके यांनी केले.
सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यशाळेत लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी.कोरोना संसर्ग झालेल्या बालकांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने आणि महाराष्ट्र टास्क फोर्स यांनी सुचित केलेली प्रचलित उपचार पध्दती,लहान मुलांचे पालकांमध्ये समुपदेशन,मुले योग्य काळजी घेवून आनंदी राहण्यासाठी पालक आणि कुटुंबियांनी करावयाच्या उपाययोजना संदर्भात माहिती सांगितली.
बालकांमध्ये कोरोंना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाचा सदुपयोग होईल असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला.पालकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.”कोरोनाला हरवू या चिमुकल्यांचे स्मित हास्य जपवू या.” हा संकल्प उपस्थितांनी केला आहे.