जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास शिवराज्याभिषेकदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नगराध्यक्ष विजय वहाडणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अभिवादन केले आहे.

दरम्यान आज कोपरगावात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.त्यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


स्वराज्याची संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी ०६ जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.शिवरायांचा राज्याभिषेक ०६ जून १६७४ दिवशी झाला.त्यामुळे दरवर्षी ०६ जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा साजरा होतो.दरवर्षी शिवराज्याभिषेक महोत्सव समिती महाराजांना मानचा मुजरा देण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.या वर्षी या शिवराज्याभिषेक सोहळ्याला एक खास गोष्ट संपन्न झाली असून राज्य सरकारनेच “शिवराज्याभिषेक दिन”साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.व त्या प्रमाणेआदेश जारी केले होते.त्या आदेशाप्रमाणे आज हा सोहळा आता ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात आला आहे.त्याला कोपरगाव नगरपरिषद अपवाद नाही.कोपरगाव नगरपरिषदेने या उत्सवाचे आयोजन केले होते.

कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त. कोपरगाव शहरातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी नगराध्यक्ष विजय सुर्यभान वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत वसंत सरोदे,उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते विरेन बोरावके,शिवसेना पक्षाचे गटनेते योगेश बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.सदर प्रसंगी उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे यांनी आयोजनास प्रयत्न केले आहे.व उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close