जाहिरात-9423439946
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५५८ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात १० रुग्ण बाधित आढळले आहे.तर ५४६ रुग्ण निरंक निघाले आहे.तर नगर येथे ४८४ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत १३ तर अँटीजन तपासणीत १२,खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०२ असे एकूण अहवालात एकूण २७ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ३३ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव तालुक्यात चांदेकसारे येथील दोन पुरुष वय-७५,४५ आदींचा तर खिर्डी गणेश येथील ४७ वर्षीय पुरुष असे तिघांचा मृत्यू झाला आहे.तथापि शहरात एकही रुग्णांचा मृत्यू झाला नाही हा मोठा दिलासा मानला जात आहे.मात्र कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर ११ हजार ९७८ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ४५६ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १९५ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६३ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ६६ हजार ७३६ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०२ लाख ६६ हजार ९४४ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १७.९५ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर ११ हजार ३२७ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९५.५७ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ५२ हजार २७५ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १० हजार ९०५ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ३८ हजार १८२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०३ हजार १८७ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान आज आलेल्या माहितीनुसार राज्यातही तेरा हजारांच्या दरम्यान रुग्णवाढ रोडावली आहे.कोपरगावही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात व ग्रामीण भागात टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम आता येऊ लागले आहे. हि नक्कीच उत्साहवर्धक बाब आहे.तसेच मृत्युदर बऱ्यापैकी कमी झाला असताना आज तालुक्यात पुन्हा तीन बळी गेल्याने हि बाब चिंता निर्माण करणारी आहे.त्यामुळे आगामी काळ उज्वल असल्याचे दिसत असले तरी मात्र नगर जिल्हा देशातील सर्वाधिक बाधित ११ जिल्ह्यात समाविष्ठ आहे.त्यामुळे नगर जिल्ह्यात सरकारने येत्या पंधरा जून पर्यंत टाळेबंदी लांबवली आहे.त्यामुळे व्यापारी व ज्यांचा रोजगार हिरावला गेला आहे असे नागरिक व व्यापारी संघटनांची आपली आस्थापने सुरू करण्यासाठी चुळबुळ वाढली आहे.तर दुसरीकडे लहान बालकांची कोरोनाची लाट कशी थोपवायची याचा विचार जिल्हा प्रशासनास करावा लागणार आहे.या कैचित जिल्हा प्रशासन सापडले आहे.