जाहिरात-9423439946
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ६६४ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात १६ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ६४८ रुग्ण निरंक निघाले आहे.तर नगर येथे ५३९ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०० तर अँटीजन तपासणीत १६,खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०२ असे एकूण अहवालात एकूण १८ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ५८ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहरातील इंदिरापथ भागातील एक ९० वर्षीय महिलेचे तर तालुक्यात येसगाव येथील एका ६४ वर्षीय इसम असे दोघांचे निधन झाले आहे.
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर ११ हजार ९१३ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ४७१ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १९१ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६० टक्के आहे.तर आज अखेर एकूण ६४ हजार ६४८ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०२ लाख ५८ हजार ५९२ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १८.४३ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर ११ हजार २५१ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९४.४४ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ५० हजार ४८८ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ११ हजार ५०० झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ३५ हजार ८९६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०३ हजार ०९१ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान आज आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. पण अशातच आणखी एक धक्कादायक माहितीची आकडेवारी समोर आली आहे.अहमदनगर जिल्ह्यात ज्या लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली होती,त्याची आकडेवारी समोर आली आहे.जी अत्यंत धक्कादायक आहेत.महाराष्ट्र सरकारनं जारी केलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येईल की, केवळ अहमदनगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात जवळपास आठ हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.कोपरगावही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात व ग्रामीण भागात टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम आता येऊ लागले आहे.परिणामस्वरूप रुग्णवाढ रोडावली असून हि नक्कीच उत्साहवर्धक बाब आहे.तसेच मृत्युदर बऱ्यापैकी कमी झाला असताना आज पुन्हा दोन बळी गेल्याने हि बाब चिंता निर्माण करणारी आहे.त्यामुळे आगामी काळ उज्वल असल्याचे दिसत असले तरी मात्र नगर जिल्हा देशातील सर्वाधिक बाधित ११ जिल्ह्यात समाविष्ठ आहे.त्यामुळे नगर जिल्ह्यात सरकारने येत्या पंधरा जून पर्यंत टाळेबंदी लांबवली आहे. आता लहान बालकांची कोरोनाची लाट कशी थोपवायची याचा विचार जिल्हा प्रशासनास करावा लागणार आहे.