जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात अकरा महिन्याच्या बाळाची कोरोनवर मात!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या चिंतेचा विषय झाली होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र कोपरगाव तालुक्यात अकरा महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरविले आहे.कोपरगावात एस.एस.जी.एम.महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरु करण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरमध्ये अकरा महिन्याच्या बाळावर उपचार करण्यात येवून या बाळाने कोरोनावर मात केली आहे.

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून वैद्यकीय सेवा करीत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचा विळखा घट्ट बसल्यामुळे साहजिकच ताण वाढला होता.मात्र आज अकरा महिन्याच्या बाळावर यशस्वी उपचार करून हे बाळ कोरोनामुक्त होऊन आपल्या आईच्या कुशीत हसतांना पाहून सगळा ताण निघून गेला”-डॉ.वैशाली बडदे.

कोपरगाव शहरात मोलमजुरी करणाऱ्या एका कुटुंबातील चारही व्यक्ती दुर्दैवाने कोरोना बाधित झाले होते यामध्ये पती, पत्नी,पंधरा वर्षाचा एक मुलगा व एका अकरा महिन्याच्या बाळाचा देखील समावेश होता. मागील आठवड्यात हे पूर्ण कुटुंब साईबाबा तपोभूमी येथे आमदार आशुतोष काळे यांनी उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले होते. मात्र अकरा महिन्याचे बाळ असलेल्या त्या मातेला ऑक्सिजनची गरज असल्यामुळे हि माता आपल्या बाळासह एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरु करण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होती.मागील आठ दिवस डॉ.कृष्णा फुलसौंदर, डॉ.वैशाली बडदे,डॉ आसिफा पठाण,डॉ. वरद गर्जे, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. दीपक पगारे यांनी यशस्वी उपचार करून या अकरा महिन्याच्या बाळाला व त्याच्या आईला कोरोनामुक्त केले असून त्यांना नुकतेच सोडून देण्यात आले आहे.

माझ्यासह संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित असल्याचे समजताच धक्काच बसला होता.अशावेळी साईबाबा तपोभूमी येथे आमदार आशुतोष काळे यांनी उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी आम्ही सर्व कुटुंब दाखल झालो. मात्र मला ऑक्सिजनची आवश्यकता असल्यामुळे मला एस.एस.जी.एम.महाविद्यालयाच्या कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटरमध्ये उपचार देण्यात आले व मी पूर्णपणे बरी देखील झाले. उपचार घेण्यासाठी घरात पैसे नसतांना देखील कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरमुळेच आज मी, माझे बाळ व माझे कुटुंब पूर्णपणे बरे होवून घरी जात आहे.- बाळाची आई

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close