आरोग्य
कोपरगावातील ..ती “माल प्रॅक्टिस” बंद करण्याची गरज !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगावात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना त्यांच्यावर उपचार करणारे काही अपवाद वगळता बाकी डॉक्टर हे केवळ पैसा कमविण्यासाठी “माल प्रॅक्टिस” करत असल्याची प्रखर टीका प्रदेश भाजपचे कार्यकारिणी सदस्य अड्.रवींद्र बोरावके यांनी नुकतीच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोपरगावात ज्यांनी कोवीड केंद्राला परवानगी आणली ते डॉक्टर आपली सेवा बजावताना दिसत नाहीत.त्यांनी अप्रशिक्षित डॉक्टरांच्या (अनक्वालीफाईंन्ड) ताब्यात ते केंद्र चालवायला दिल्याचे दिसून येत आहे.त्यांच्या नावाने मोठी आर्थिक लूट करत आहे.हलगर्जीपणामुळे अनेक कोवीड रुग्णांचे जीव जात आहेत.याला जबाबदार कोण ? तालुका प्रशासन नेमके काय करत आहे-अड्.रवींद्र बोरावके,सदस्य प्रांतिक भाजप.
कोरोना साथीने देशात थैमान घातलं आहे.अशातच देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या चोवीस तासांत ०२ लाख ६३ हजार ५३३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.दरम्यान, काल देशात ४ हजार ३२९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.तर चार लाख २२ हजार ४३६ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.दरम्यान, देशात १६ एप्रिल २०२१ नंतर पहिल्यांदाच एवढ्या कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे अशातच कोरोना रुणांना दिलासा देण्याचे काम त्या-त्या शहरातील डॉक्टरांचे असताना अनेक ठिकाणी या साथीची भीती दाखवून रुग्णांच्या नातेवाईकांना लुटण्याचे काम अनेक डॉक्टर करताना दुर्दैवाने दिसत आहे.अशाच घटना कोपरगावात घडत असून त्यामुळे अनेकांना फटका बसत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रसिद्धी पत्रक रवींद्र बोरावके यांनी दिल्याने या प्रश्नाला वाचा फुटली आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,”कोरोनाच्या दृष्ट चक्रात रुग्ण व त्यांचे नातेवाईक सापडल्यावर अतिशय घाबरलेले असतात,याचा गैरफायदा काही मेडीकल प्रक्टीशनर घेऊ लागले आहेत असे दिसून येत आहे.काही डॉक्टर सेवावृत्तीने हे काम करत आहेत पण काही डॉक्टर मात्र लुबाडत आहेत.मागच्या कोरोनाच्या वेळी हीच मंडळी दवाखाने बंद करुन २-३ महिने बाहेरगावी निघुन गेले होती. ते डॉक्टर आता कोवीड रुग्ण भरती करुन लाखों रुपये कमावतांना दिसताहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने व आरोग्य विभागाने ‘रेमडेसिव्हीर’ गरज नसतांना वापरु नका,असे निक्षून सांगून सुध्दा काही मंडळी त्याचाच वापर करतांना दिसत आहेत.त्याचे दुष्परिणाम आता सार्वत्रिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.सरकारने रुग्णांचे सेवा दर ठरवून दिलेले असतांना सुध्दा अवाच्या-सव्वा पैसे उकळले जात आहेत हे स्पष्ट दिसते आहे.कोणीही त्या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार करतांना दिसत नाही.केली तरी उपयोग होत नाही.”सब मिलीभगत है…” असेच वाटत आहे.ज्यांनी कोवीड केंद्राला परवानगी आणली ते डॉक्टर आपली सेवा बजावताना दिसत नाहीत.असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे.त्यांनी अप्रशिक्षित डॉक्टरांच्या (अनक्वालीफाईंन्ड) ताब्यात ते केंद्र चालवायला दिल्याचे दिसून येत आहे.हलगर्जीपणामुळे अनेक कोवीड रुग्णांचे जीव जात आहेत.याला जबाबदार कोण? असा सवाल विचारून यावर प्रशासकिय यंत्रणा काय पहात आहे? नागरिकांनी एकजूट करुन अशा “माल-प्रक्टीस” बाबत आवाज उठवण्याची वेळ निश्चितच आली आहे.या विषयांवर काही नागरीकांशी बोलून लवकरच निर्णय घेतला जाईल असेही शेवटी या बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देताना शेवटी आश्वासित केले आहे.त्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.