आरोग्य
कोपरगावात लस वाटपाचा फज्जा,तरुणाईचा संताप उफाळला!
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात आज कोरोना लस देण्याच्या वेळी आरोग्य विभागाकडून नियोजनाचा अभाव दिसून आल्याने उपस्थित तरुणांच्या सहनशीलतेचा बांध फुटल्याने अखेर या ठिकाणी नागरिकांना पांगविण्यासाठी शहर पोलिसांना पाचारण करावे लागल्याची नामुष्की दिसून आली असून या बाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.व कोविड साथीत नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असे आवाहन अनेकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.
“या बाबत आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फौलसुंदर यांनी दुजोरा दिला आहे.मात्र सविस्तर माहिती,” जाऊद्या…” म्हणून टाळली आहे.याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,” नियोजन कोलमडल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे”मात्र त्या ठिकाणी लाठी चार्ज केल्याच्या घटनेला थेट “उत्तर देणे” टाळले आहे.मात्र अनेक उपस्थितांनी मात्र या घटनेला दुजोरा दिला आहे”दरम्यान हीच स्थिती तालुक्यातील अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रांवर होती.
या बाबत आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फौलसुंदर यांनी दुजोरा दिला आहे.मात्र सविस्तर माहिती,” जाऊद्या…” म्हणून टाळली आहे.याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,” नियोजन कोलमडल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे”.मात्र त्या ठिकाणी लाठी चार्ज केल्याच्या घटनेला थेट “उत्तर देणे” टाळले आहे.मात्र अनेक उपस्थितांनी मात्र या घटनेला दुजोरा दिला आहे.
कोपरगाव आरोग्य विभागाच्या कारभाराचा थेट फज्जा उडण्याची हि पहिलीच घटना असली तरी आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराची लक्तरे या आधी वेशीला टांगली गेली असून अनेक रुग्णांना कोरोना रुग्ण तपासणी संचचा अभाव,रेमडीसीविर इंजेक्शन,ऑक्सिजन,खाटांची कमतरता यांच्या बाबत सविस्तर वृत्त छापून आले आहे.पुढाऱ्यांची प्रसिद्धीची “अधिकची हौस” दिसून आली आहे.नागरिकाना त्यामुळे मोठी किंमत चुकवावी लागली आहे.आलेल्या नागरिकांना उभे राहण्यासाठी सुरक्षित अंतर राखण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेले नव्हत्या.पाण्याची व्यवस्था आदींचा अभाव दिसून आला आहे.हि गर्दीमुळे कोरोना प्रसार होण्याची शक्यताच अधिक बळावली आहे.त्याबाबत आरोग्य विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.कोपरगाव तालुक्यात नेकमे किती कोरोना रुग्ण,किती मृत्यू याचा प्रसिद्धी माध्यमांसकट कोणालाही थांगपत्ता नाही हा या तालुक्याच्या कारभाराचा विशेष !