आरोग्य
कोपरगावात कोरोना तपासणी संचाअभावी कोरोना बाधित रुग्णदर मंदावला
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरम्यान कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृत्युदर वाढला असून कोरोनाचे रुग्ण हि मोठ्या प्रमाणात वाढले असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियंत्रणासाठी कोपरगाव तालुक्यात दिनांक २८ एप्रिल पासून ते ०२ मे या कालावधीत माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्या पथकास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी केले आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ७५ हजार ०९४ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २१ हजार ७५४ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ५१ हजार ३२६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ३२ जणांची मृत्यूची वाढ होऊन ती संख्या ०२ हजार ०१३ झाली आहे.कोपरगाव तालुक्यात २९ दिवसात ७१ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.मात्र कोरोना तपासणीसाठी आवश्यक संच उपलब्ध नसल्याने तालुक्यातील बाधित रुग्णांची सर्व वाऱ्यावरील वरात असल्याचे दिसून येत आहे.कोरोनावर मात करण्यासाठी कोविड लस हा एकमात्र पर्याय दिसत असल्याने त्याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहे.मात्र मागणी आणि पुरवठा याबाबत मोठी तफावत असल्याने याचा ताळमेळ लावण्यास उशीर होणार हे उघड आहे.तो पर्यंत नागरिकांना आपला जीव मुठीत धरून राहावे लागणार आहे.