आरोग्य
कोपरगावातील कोरोना सेंटरची प्रांताधिकारी यांचे कडून पहाणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोरोना संसर्ग बाधित व्यक्तीवर प्रथमोपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरची पहाणी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी नुकतीच केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागत आहे.या मुळे तालुक्यातून कोरोना सेंटरची मागणी वाढली आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी कोपरगाव तालुक्याचा आढावा घेतला आहे.
सदर प्रसंगी त्यांनी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट,साईबाबा तपोभूमी,कोपरगाव,एस.एस.जी.एम.महाविद्यालय कोपरगाव आणि आत्मा मालिका इंग्लिश मेडिअम स्कूल येथे उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरला भेट देवून आढावा घेतला आहे.
सदर प्रसंगी कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे,कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते,विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर,आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके यांचे सह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.