निधन वार्ता
बंडोपंत चिंचपुरे यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील रहिवासी ईंद्रराज उर्फ बंडोपंत पोपटराव चिंचपुरे (वय ६५) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्यावर कोपरगाव नगरपरिषद स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांचे पच्छात पत्नी,बंधू,कौस्तुभ,अनिकेत ही दोन मुले यासह नातेवाईक व मोठा मित्रपरिवार राहिला आहे.नाना या नावाने ते परिचित होते.
स्व.बंडोपंत चिंचपुरे यांचा कोपरगावात शेती व्यवसाय,पिठ गिरणीचा व्यवसाय होता.त्यांनी सन २०१३ या वर्षात गोदावरी स्वच्छता अभियानात योगदान दिले होते.वृक्षारोपण आणि संवर्धन हा त्यांचा आवडीचा विषय होता.गरिबी आणि कष्टाची जाण असल्याने जनसामान्यांच्या मदतीला नेहमी धावून जात असे.सूर्यतेज संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होत. कोरोना संकटात गरजूंना मदत कार्यात नेहमी सहभागी झाले होते.