आरोग्य
कोपरगावात आज कोरोनाचे सहा बळी,तपासणी संचाची कमतरता
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरम्यान कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृत्युदर वाढला असून कोरोनाचे रुग्ण हि मोठ्या प्रमाणात वाढले असतानाही नागरिक सकाळच्या आठ ते अकरा वाजेच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेबाबत अनावश्यक गर्दी करताना दिसत आहे,त्यामुळे आता पोलिसांना आपल्या हातातील काठीच्या मुठी आवळण्याची गरज निर्माण झाली आहे तर दुसरीकडे रुग्णांना तपासणीसाठी कोरोना किट उपलब्ध नाही.या शिवाय नागरिकांना देण्यात येणारी लस अद्याप उपलब्ध नसल्याने नागरिकांत अस्वस्थता दिसून येत आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ५८ हजार ८७१ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २४ हजार ११७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ३२ हजार ९२८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ८२५ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोपरगाव तालुक्यात २४ दिवसात ६३ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.