जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात माळी समाजाच्या वतीने कोरोना रुग्णांना औषधांची भेट

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात वाढत असललेल्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका माळी समाजाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात भरती रुग्णांना आवश्यक असलेल्या वैद्यकीय साहित्याची भेट नुकतीच मान्यवरांनी दिली आहे.या बाबत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

देशभरात कोरोनाने कहर केला असून कोपरगावात वेगळी परिस्थिती नाही.रुग्णालयात आवश्यक औषधांचा साठा नाही,रुग्णांना प्राणवायू मिळेनासा झाला आहे.या स्थितीत सरकारला मर्यादा येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका माळी समाजाने समाजाचे आपण काही देणे लागतो या सामाजिक भावनेचे जतन करून रुग्णलयात भरती असलेल्या रुंगांना अल्पमती मदत करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला असून विशेष म्हणजे उक्तीला कृतीची जोड दिली आहे.

देशात कोरोना विषाणूचा आकडा अगदी झपाट्यानं वाढू लागला आहे.नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे.मागील २४ तासांत भारतात एकूण ०३ लाख ५२ हजार ९९१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली.आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा ठरत आहे.राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे.राज्यात रविवारी ६६ हजार १९१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.तर आज ६१ हजार ४५० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.आतापर्यंत एकूण ३५ लाख ३० हजार ६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८२.१९ टक्के झाले आहे.राज्यात एकूण ०६ लाख ९८ हजार ३५४ सक्रिय रुग्ण आहेत.राज्यात अनेक रुग्णांना खाटा,तर काहींना प्राणवायू,तर अनेकांना रेमडीसीविर हे इंजेक्शन मिळेनासे झाल्याने अनेकांना आपला हकनाक जीव गमवावा लागतं आहे.या इंजेक्शनचा मोठा काळा बाजार सुरु आहे.कोपरगावात वेगळी परिस्थिती नाही.रुग्णालयात आवश्यक औषधांचा साठा नाही,रुग्णांना प्राणवायू मिळेनासा झाला आहे.या स्थितीत सरकारला मर्यादा येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका माळी समाजाने समाजाचे आपण काही देणे लागतो या सामाजिक भावनेचे जतन करून रुग्णलयात भरती असलेल्या रुंगांना अल्पमती मदत करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला असून विशेष म्हणजे उक्तीला कृतीची जोड दिली आहे.

त्यांनी दिलेल्या चिजवस्तुत नोरर्मल सलाइन २ हजार बाटली,अनोक्सपरिन इंजेशन १०० नग,ऑक्सिजन मास्क आणि बॅग ४९ नग,ग्लोज १० बॉक्स, मास्क-१ हजार नग आदींचा समावेश आहे.त्यामुळे उपस्थित कोपरगाव रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या औषधांचा स्वीकार करून समाधान व्यक्त केले आहे.माळी समाजाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close