जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी आवश्यक-नगराध्यक्ष

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर किमान पंधरा दिवस संपुर्ण कडकडीत टाळेबंदी पाळणे अत्यंत गरजेचे आहे.किराणा,भाजीपाला बंद झाल्यानंतर जनतेची अडचण होणार आहे यात शंका नाही.पण आज कोपरगावातील कोरोना वाढीचा वेग व मृत्युचे प्रमाण बघता आपणच कठोर निर्णय घेणे क्रमप्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच केले आहे.

“कोपरगावातील टाळेबंदी राजकिय दबावामुळे प्रभावहीन दिसत आहे.काही व्यवहार सुरू असल्याने लोक घराबाहेर पडणार व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणारच आहे.शंभर टक्के संचारबंदी-व्यवहार बंदी हाच एकमेव उपाय सध्या तरी दिसत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापने बंद करणे गरजेचे आहे तरच साथ नियंत्रणात येईल”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून नगर येथे ४५९ श्राव तपासणीसाठी पाठवले असून त्यातील १८९ बाधित आले आले आहे.तर १३० जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आजपर्यंत ७३ नागरिकांचे बळी गेले आहे.तरीही नागरिक शहरात टाळेबंदी पाळायला तयार असल्याचे दिसत नाही त्यामुळे आगामी काळातील चित्र भयावह दिसत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,”राजकिय दबावामुळे आज सुरू असलेली टाळेबंदी प्रभावी ठरत असलेली दिसत नाही.काही व्यवहार सुरू असल्याने लोक घराबाहेर पडणार व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणारच आहे.शंभर टक्के संचारबंदी-व्यवहार बंदी हाच एकमेव उपाय सध्या तरी दिसतो.दवाखाने,औषधें,लॅब सर्व वैद्यकीय सेवा अती आवश्यकच आहेत.सकाळी अकरा वाजेपर्यंतच दुध विक्री व्हावी.सर्वांच्याच कितीही अडचणी वाढणार असल्या तरीही सहन करावे लागणार आहे.अन्यथा कोरोनामुळे कुणाचा कधी घात होईल हे सांगताच येत नाही.गरीब-सर्वसामान्य कुटुंबातील कुणी कोरोनामुळे रुग्णालयात भरती झाले तर घरदारच विकावे लागेल इतके महागडे उपचार करावे लागतात.अशा वेळी त्या परिवाराला कोण आर्थिक मदत करणार.आज सर्व शासकिय यंत्रणा तोकडी पडत आहे.खाटा नाहीत,प्राणवायू नाही,इंजेक्शन नाहीत असे संकट आजच आहे.यानंतर अजून भयावह परिस्थिती येऊ शकते.कारण अनेक शासकिय अधिकारी-कर्मचारीच कोरोनामुळे जायबंदी झालेत.यंत्रणाच कोसळून पडली तर काय ?

नागरिकांचे जिवीत सुरक्षित रहावे म्हणून आपण हे मत प्रदर्शन केले आहे.अशा काळात राजकिय विचार न करता सर्वांनी एकजुटीने कोरोना विरोधात लढले पाहिजे.रुग्णालये,औषधालये,प्रयोग शाळा,वैद्यकीय सुविधा-दुध वगळता इतर सर्व व्यवहार किमान पंधरा दिवस शंभर टक्के बंद ठेवावेत.असे आपले मत आहे.

तरीही केवळ नागरिकांना जास्त अडचणीचे होऊ नये म्हणून आठवड्यातून फक्त एक दिवस दर मंगळवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत किराणा-भाजीपाला व्यवसाय सुरू ठेवावेत मागील वर्षाप्रमाणे अनेक समाजसेवक,स्वयंसेवी संस्था,संघटना,सहकारी संस्था,नेते,राजकिय पक्ष गरजूंना अन्न पाकिटे देऊन आधार देऊ शकतात.आगामी काळ भयानक असणार असल्याचे चित्र आहे.केंद्र शासन-राज्य शासन-सर्व यंत्रणा रात्रंदिवस राबत असतांना एक नागरिक म्हणून अशा संकटात तरी आपण स्वतःहून काही निर्णय घेणे,नियम-कायदे-सूचना पाळणे महत्वाचे ठरणार आहे.आपल्या पैकी कुणीही कोरोनाच्या लाटेत सापडू नये याच हेतूने आपण हे सर्व जाहिर केले आहे.ज्यांची असे करायला मान्यता नसेल त्यांना बळजबरी करण्याचा आपल्याला अधिकार नाही हेही आपण जाणतो पण आपल्या सर्वांचे जीवित सुरक्षित रहावे यासाठी नागरिकांनी,लहान मोठ्या व्यावसायिकांनी माझ्या मताचा गंभीरपणे विचार करावा असे आवाहनही नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close