जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात तातडीने प्रतिबंधात्मक औषधें उपलब्ध करून द्या-यांची मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने मुबलक कोरोना प्रतिबंधक लस व बाधित रुग्णांना आवश्यक औषधे तातडीने उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.

कोपरगाव शहर पुन्हा एकदा उचांकी रुग्णवाढ होत आहे.प्रशासनाला रुग्ण वाढीला आळा घालण्यात अपयश येत असून शहर व तालुक्यात टाळेबंदी सुरु झाली आहे.तालुक्यात प्रतिबंधात्मक औषधें कमी पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी हि मागणी केली आहे.

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरंगाव तालुक्यातुन नगरला तपासणी साठी १०१ श्राव पाठवले असून तेथून तपासून आलेल्या अहवालात ९४ बाधित रुग्ण आहे तर खाजगी प्रयोग शाळेतून तपासणी केलेल्या अहवालात २४ तर एकूण रॅपिड टेस्ट २२५ रॅपिड टेस्ट करण्यात येऊन त्या मधून ८१ असे एकूण १९९ रुग्ण बाधित आढळल्याने कोरोनाचा वाढणारा विक्रम थांबत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.आज उपचारानंतर ८० रुग्णांना सोडून देण्यात आले आहे.असल्याने कोपरगाव शहर पुन्हा एकदा उचांकी रुग्णवाढ होत आहे.प्रशासनाला रुग्ण वाढीला आळा घालण्यात अपयश येत असून शहर व तालुक्यात टाळेबंदी सुरु झाली आहे.तालुक्यात प्रतिबंधात्मक औषधें कमी पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हि मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात आ.काळे यांनी असे म्हटले आहे कि,”कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे औषधांची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे औषध साठा कमी होऊ लागला आहे.त्यामुळे बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक औषधे मिळविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाबरोबरच उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे इतरही साथींचे आजार वाढले आहेत. कोरोना बाधित रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या रेमडेसिवीर सारख्या औषधांचा देखील काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.रुग्णांना आवश्यक असलेली औषधे मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे.औषधांचा साठा कमी असल्यामुळे काही ठिकाणी या औषधाचा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तसेच औषधांचा साठा कमी असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना औषध घेण्याची आर्थिक परिस्थिती नसतांना देखील मिळेल त्या किंमतीत औषधांची खरेदी करावी लागू शकते. औषध वेळेत मिळाले नाही तर अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना हतबल होण्याची वेळ येऊ शकते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून कोपरगाव मतदार संघात देखील प्रभावीपणे लसीकरण मोहीम राबविली जात आहे.मात्र कोरोना प्रतिबंधक लस देखील कमी प्रमाणात मिळत असून त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर होत आहे.

एकूण परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासठी मुबलक कोरोना प्रतिबंधक लस व आवश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होणार नाही व बाधित रुग्णांना योग्य किंमतीमध्ये औषध वेळेत उपलब्ध व्हावीत यासाठी कोपरगाव मतदार संघासाठी जास्तीत जास्त औषधांचा पुरवठा करण्यासाठी संबंधित यंत्रणेस तातडीने आदेश द्यावेत अशी मागणी आ.काळे यांनी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे व अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात शेवटी केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close