आरोग्य
कोपरगावात मोठी रुग्णवाढ ठरली प्रशासनाची डोकेदुखी !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार ५८२ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ३६३ असून आज पर्यंत ४९ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.३७ टक्के आहे.तर एकूण २२ हजार ४२० जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ८९ हजार ६८० असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १५.९८ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार १७० इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८८.५० टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.गत वर्षीचा एक दिवसीय ६८ रुग्णवाढीचा विक्रम आजच्या आकडेवारीच्या मोडला असून या विक्रमी रुग्णवाढीमुळे आता कोपरगाव शहर व तालुक्यावर टाळेबंदीची तलवार टांगली आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-६९ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव शहरात एकूण ४५ रुग्ण आहे.त्यात संभाजीनगर पुरुष वय-८२,गांधीनगर दोन महिला वय-७०,३३,पुरुष वय-३६,साई नगर पुरुष वय-६६,४४,३०,कोपरगाव पुरुष वय-१२,३६,श्रधानगरी पुरुष वय-६५,कोपरगाव बेट पुरुष-५८,रेल्वेस्टेशन पुरुष वय-२९,सह्याद्री कॉलनी पुरुष वय-५५,१९,महिला वय-२३,संजीवनी पुरुष वय-५७, महिला वय-२७,४७,खडकी पुरुष वय-२८,बागुल वस्ती पुरुष वय-४६,साईसीटी पुरुष वय-४१,महिला वय-४०,१६,हनुमानगर पुरुष वय-२४,महिला वय-३०,अंबिकानगर महिला वय-३४,४४,इंदिरा पथ पुरुष वय-४९,महिला वय-४३,वडांगळे वस्ती महिला वय-५३,सराफ बाजार महिला वय-५०,३३.गिरमेचाळ पुरुष वय-५४,निवारा रोड महिला वय-२३,कहार गल्ली पुरुष वय२६,गोदाम गल्ली महिला वय-३७,धारणगाव रोड पुरुष वय-६१,३८,५५,येवला रोड पुरुष-४५,खडकी पुरुष वय-५८,गुरुद्वारा रोड पुरुष वय-७३,महिला वय-६३,रचना पार्क महिला वय-२९ आदींचा समावेश आहे,
कोपरगाव तालुका एकूण २४ रुग्ण आहे.त्यात करंजी पुरुष वय-३५,४१,महिला वय-२९,०३,२८,०९,२४,३९,१८,२०,शिंगणापूर पुरुष वय-५६,३१ रवंदे पुरुष वय-३४,महिला वय-१० गौतमनगर पुरुष वय-४२,जेऊर पाटोदा पुरुष वय-३८,४०,४५,येसगाव पुरुष वय-६०,कान्हेगाव पुरुष वय-३४, कुंभारी पुरुष वय-४८.महिला वय-३८,बहादराबाद पुरुष वय-४७,मुर्शतपुर पुरुष वय-५५ आदींचा समावेश आहे,
दरम्यान कोरोना वाढीचा दर पुन्हा गतवर्षीप्रमाणे उच्चान्क गाठतो का असा संभ्रम तयार झाला होता तो आज मोडीत निघाला आहे.आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.सरकारने तसे आज नवीन नियम जाहीर केले आहे.