जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात कोरोनाची पुन्हा उसळी,

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोना बाधित रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे.कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत.यात मुंबई,पुणे,नागपूर,अमरावती,अकोला,यवतमाळ,बुलढाणा,वाशिम या जिल्ह्यांचा समावेश झाला असताना आता कोपरगाव तालुक्यातही धक्कादायक माहिती हाती आली असून दोन दिवसात २९ रुग्ण आढळल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यात गत दोन महिन्यात कोरोना नीचांकी पातळीवर घसरला होता.त्यामुळे तालुक्यात समाधान व्यक्त होत होते तर दुसरीकडे आरोग्य विभाग व महसूल विभागाने सुटकेचा श्वास सोडला असताना तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने उचल खाली आहे.गत दोन दिवसात तब्बल २९ रुग्ण आढळले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

आज आलेल्या अहवालात चौदा रुग्ण बाधित आढळले असून त्यात कोपरगाव शहरात-०६ तर कोळपेवाडीत-०३,साकरवाडी,पोहेगावात प्रत्येकी -०१ तर सांगवी भुसार येथे-०३ रुग्ण आढळले आहे.

तर काल आलेल्या अहवालात नगर येथील अहवालात-०५,खाजगी प्रयोग शाळेतील अहवालात -१०,रुग्ण बाधित आढळले होते. तर १० रुग्णांना उपचारानंतर सोडून देण्यात आले होते.तर काल अखेर सक्रिय रुग्ण १८ असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजय गणबोटे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात नागरिकांत पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.

तर तालुका प्रशासनने हा प्रश्न गांभीर्याने घेतला असून त्यावर उपाय योजना सुरु केल्या आहेत.शहर व तालुका पोलिसानी या प्रश्नी उपाय योजना सुरु केल्या असून जे नागरिक मुखपट्टी बांधत नाही त्यांच्यावर कारवाई सुरु केली आहे.त्यामुळे नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे बनले आहे.लग्न,विधी,अन्य सोहळे आता नागरिकांना कमी माणसात साजरे करावे लागणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close