कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात अवैध वाळु तस्करी वाढली !
जनशक्ती न्यूजसेवा
कुंभारी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चार हजार लोकसंख्येच्या कुंभारी गावाला मोठे गोदावरीचे नदीपात्र लाभले असून आता नदी पात्रातील पाण्याची पातळी विक्रमी पातळीवर कमी झाल्याने वाळूचोरांना फावले असून वाळू चोरी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.
वाळू हे गौण खनिज कागदोपत्री म्हटले जातअसले तरी त्यातून मिळणारा प्रचंड पैसा हा वाळूचोरांना या अवैध व्यवसायाकडे खेचून आणत आहे.बेरोजगार तरुण या व्यवसायाकडे खेचले जात आहे.प्रचंड पैसा हा अनेक गुन्हेगारीला जन्म देत आहे.त्याला पोलीस,महसूल विभाग आपल्या आर्थिक लाभासाठी आतून बळ देत आहे.हा खरा चिंतेचा विषय आहे त्यावर राजकीय नेतृत्वाने लक्ष देण्याची गरज आहे.
वाळू हे गौण खनिज कागदोपत्री म्हटले जातअसले तरी त्यातून मिळणारा प्रचंड पैसा हा वाळूचोरांना या अवैध व्यवसायाकडे खेचून आणत आहे.बेरोजगार तरुण या व्यवसायाकडे खेचले जात आहे.प्रचंड पैसा हा अनेक गुन्हेगारीला जन्म देत आहे.त्याला पोलीस,महसूल विभाग आपल्या आर्थिक लाभासाठी आतून बळ देत आहे.हा खरा चिंतेचा विषय आहे.कमी श्रमात मिळणारा पैसा साम-दाम-दंड-भेद या नितीचा असलेला अवलंब या जोरावर काही जणांनी थोडीफार रकमेची गुंतवणूक करून जुनाट ट्रॅक्टर,अन्य अवजड वहाने,विनाकागदपत्र असलेली कालबाह्य वाहने खरेदी करून वाळू वाहतुकीसाठी वापर केला जात असल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे.यातून कमीत कमी वेळेत वाळू उपसा करून जवळपासच्या गावात केली जाते.काहींनी तर थेट वन खात्याच्या जमिनीत वाळू साठे केलेले आहेत.इकडे या अवैध वाळूचोरीमुळे शासनाचा महसूल कमी झालेला आहे.पैशामुळे कोपरगाव तालुक्याच्या नदीकाठ आतील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूच्या विक्रीत वाढ झाली असून दारू उत्पादन शुल्क विभागाच्या आधिकारी व पोलिसांचे दुर्लक्ष यांचा काहीसा परिणाम तरुण वर्गात व्यसनाधीनता वाढण्यात होत असल्याचे दिसते आहे.काहींचा तर या व्यसनामुळे अकाली मृत्यूचे प्रमाणही वाढते आहे.यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडत असताना याकडे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी गंभीरपणे कारवाईसाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मिळणाऱ्या उत्पन्नामुळे ग्रामीण भागात किरकोळ हाणामारी सारखे प्रकार देखील वाढत आहे.याच वाळूमुळे काही तरुणांचा बळी देखील गेल्याचा इतिहास कोपरगाव तालुक्याला आहे.यातून काही बोध प्रशासनाने घ्यावा. याकडे होणारे दुर्लक्ष याची किंमत मात्र ग्रामीण भागातील लोकांना मोजावी लागत आहे.अवैध वाळु तस्करावर धाक निर्माण होईल अशा प्रकारची कारवाईसाठी पोलीस व महसूल यंत्रणेने एकत्रित करणे गरजेचे बनले असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.