आरोग्य
शिर्डीत २४ तारखेला रक्तदान शिबिराचे आयोजन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने दिनांक २४ नोव्हेंबर रोजी साईआश्रम ०१ निवासस्थान (०१ हजार रुम) येथील शताब्दी मंडपामध्ये सकाळी ०९.०० ते सायं.०५.०० यावेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक शिर्डी ग्रामस्थ, साईभक्त व संस्थान कर्मचा-यांनी या रक्तदान शिबीरात रक्तदान करुन श्री साईंच्या चरणी आपली सेवा अर्पित करावी असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी नुकतेच केले आहे.
श्री साईबाबा संस्थानची श्री साईनाथ रक्तपेढी ही महाराष्ट्रातील नामांकीत रक्तपेढी असून अहमदनगर जिल्ह्यातील जवळजवळ निम्याहुन अधिक रक्तपुरवठा या रक्तपेढीमार्फत करण्यात येतो मात्र वर्तमानात रक्तदानाची अपुर्तता आहे-कान्हूराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी साई संस्थान.
श्री.बगाटे म्हणाले,जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणु (कोवीड १९) ची साथ चालु असून कोरोना विषाणुच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने दिनांक १७ मार्च पासुन ताळेबंदी करण्यात आलेली होती. सध्या अनुक्रमे हळूहळू हटविण्यात येत असून जनजीवन पुर्वपदावर येत आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्णांकरीता अथवा प्लॅन शस्त्रक्रिया तसेच तातडीचे शस्त्रक्रिया करीता रक्ताची टंचाई भासत चालेली आहे. तसेच श्री साईबाबा संस्थानची श्री साईनाथ रक्तपेढी ही महाराष्ट्रातील नामांकीत रक्तपेढी असून अहमदनगर जिल्ह्यातील जवळजवळ निम्याहुन अधिक रक्तपुरवठा या रक्तपेढीमार्फत करण्यात येतो.
सध्याच्या स्थितीला श्री साईनाथ रक्तपेढीमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध नाही.तसेच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता गरजु रुग्णांसाठी रक्तांची निकड लक्षात घेऊन रक्तदान हे सर्वश्रेष्ठ व पवित्र दान असल्याने श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मंगळवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी साईआश्रम ०१ निवासस्थान (०१ हजार रुम) येथील शताब्दी मंडपामध्ये सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रक्तदान शिबीरामुळे रक्तांची टंचाई काही प्रमाणात कमी होणेस नक्कीच मदत होईल असे सांगुन जास्तीत जास्त इच्छुक शिर्डी ग्रामस्थ,साईभक्त व संस्थान कर्मचारी यांनी या रक्तदान शिबीरात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन ही श्री.बगाटे यांनी शेवटी केले आहे.