आरोग्य
कोरोनावर प्रसाराचा लवकरच प्रतिबंध-सभापती जगधने
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी “माझे कुटुंब,माझी जबाबदारी” मोहिमेच्या माध्यमातून स्वयंसेवक,आरोग्य कर्मचारी,आशा सेविका,अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करीत असून नागरिक देखील या आरोग्य तपासणीला सहकार्य करीत असल्यामुळे माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येईल असा विश्वास सभापती पोर्णिमा जगधने यांनी व्यक्त केला आहे.
कोपरगाव तालुक्यात १५ सप्टेंबर पासून “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” हि मोहिम प्रभावीपणे राबविली जात आहेत.आरोग्य तपासणी कर्मचाऱ्यांना आ.आशुतोष काळे यांनी इंफ्राग्रेड थर्मामीटर,ऑक्सिमीटर,फेसशिल्ड,मुखपट्या आदी साहित्य दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी करतांना त्यांचे आरोग्य देखील अबाधित राहात आहे-सभापती पौर्णिमा जगधने
कोपरगाव तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या “माझे कुटुंब-माझी जबाबदारी”या मोहिमेचा आढावा कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने आढावा घेतला याप्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,सोनालीताई साबळे,पंचायत समिती सदस्य अनिल कदम,मधुकर टेके,श्रावण आसने,कारभारी आगवन,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे,सुनील शिंदे,सचिन चांदगुडे,राहुल रोहमारे,देवेन रोहमारे,नरहरी रोहमारे डॉ.वैशाली बदडे,डॉ. ए. पी. खोत,डॉ.पी.जी.भगत,डॉ.पूजा बोर्डे,विजय गायकवाड,संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”कोपरगाव तालुक्यात १५ सप्टेंबर पासून “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” हि मोहिम प्रभावीपणे राबविली जात आहेत.आरोग्य तपासणी कर्मचाऱ्यांना आ.आशुतोष काळे यांनी इंफ्राग्रेड थर्मामीटर,ऑक्सिमीटर,फेसशिल्ड,मुखपट्या आदी साहित्य दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी करतांना त्यांचे आरोग्य देखील अबाधित राहात आहे.दैनदिन जवळपास १५ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात असून या मोहिमेद्वारे नागरिकांना कोरोना सदृश्य लक्षणे आहेत का ? त्याचबरोबर नागरिकांना असलेल्या इतर आजारांची माहिती दिली आहे.