आरोग्य
कोपरगाव तालुक्यात उच्चांकी रुग्ण वाढ
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात गत तीन दिवसात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठला असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण २८७ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ३७ बाधित आढळले आहे.तर ५३ संशयित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून दिले आहे. तर खाजगी प्रयोग शाळेतील २९ तर नगर येथील प्रयोग शाळेतील ०२ असे एकूण बाधित ६८ रुग्ण आढळले असल्याची माहिती दिली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.दरम्यान आज आढळलेली रुग्ण वाढ आजपर्यंत सर्वाधिक असून ग्रामीण भागात ५० तर शहरी भागात १८ रुग्ण वाढले असून टाकाळीत एक ५८ वर्षीय इसमाचे निधन होऊन मृत्यू पावलेल्या इसमांची संख्या २९ झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ३६ हजार ०२४ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ५८१ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून २९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत दोन दिवसात तीन बळी गेल्याने त्यामुळे अधिकची चिंता वाढली आहे.