जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ३० हजार ७५९ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ४६८ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून २४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काही दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांसह एक आरोग्य कर्मचाऱ्यास आपले प्राण गमवावे लागले असून अनेक प्रतिष्ठितांना कोरोनाची लागण झाली आहे.
आज आलेल्या यादीत शहरात ११ बाधित रुग्णांची संख्या तर ग्रामीण भागात २६ असे ३७ रुग्ण बाधित निघाले असून यात खाजगी प्रयोग शाळेतील रुग्ण या वेळी आढळले नाही तरी एकूण रुग्ण संख्या पाहता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज कोपरगाव शहरात आढळलेल्या उर्वरित बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे गजानन नगर पुरुष वय-४५, एक महिला वय-५९, स्वामी समर्थ नगर एक पुरुष वय-४८,साई सिटी एक महिला वय-२३, कोपरगाव बेत दोन पुरुष वय-६०,२९, संजय नगर एक महिला वय-३१,लिंबारा मैदान एक महिला वय-७०,महावीर कॉलनी एक पुरुष वय-४३, एक महिला वय-५१,इंदिरा नगर एक पुरुष वय-४३ आदी ११ बाधित रुग्णांचा समावेश आहे.
तर ग्रामीण भागातील २६ रुग्ण पुढील प्रमाणे उक्कडगाव ६ पुरुष वय-३०,३३,२३,६०,२५,५० तर ८ महिला वय-३०,४२,६०,३८,३३,४०,२१,३८ आदींचा समावेश आहे.तर करंजी एक पुरुष वय-४१, एक महिला वय-१७,येसगाव एक महिला वय-३५,खिर्डी एक पुरुष वय-५०,कोळपेवाडी एक पुरुष वय-७०, जेऊर कुंभारी दोन महिला वय-१९,५५,कारवाडी दोन पुरुष वय-२५,५० तर दोन महिला वय-४५,२१ तर कोकमठाण येथे एक महिला वय-६५ आदींचा समावेश आहे.त्या मुळें ग्रामीण भागातही भीती पसरली आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १३७१ इतकी झाली आहे.त्यात १७८ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत २४ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७५ टक्के आहे.आतापर्यंत ०५ हजार ७२१ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला २२ हजार ८८४ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २३.०९ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ११६९ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८५.२६टक्के झाला आहे.दरम्यान या विक्रमी बाधित आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली असली तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.