जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

नगर-मनमाड रस्ता त्वरित दुरुस्त करा-मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

सावळीविहीर (प्रतिनिधी)

नगर मनमाड महामार्गावर कोपरगाव ते सावळीविहीर निमगाव या दरम्यान सध्या मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. अनेक वाहनांचे टायर फुटणे,पलटी होण्यासह मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तीय हानी होत असल्याने या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.

नगर-मनमाड महामार्गावर निमगाव बाह्य वळण मार्गापासून सावळीविहीर ते कोपरगाव पर्यंत या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत.या रस्त्याला खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हे समजणे अवघड बनले आहे.जड वाहतूक व इतर प्रवासी वाहनधारकांना य या रस्त्याने वाहन चालवणे मोठे कठीण जात आहे.या खड्ड्यांमुळे अनेकदा अवजड वाहने पलटी होत आहेत.त्यामुळे हा मार्ग त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

वर्तमान कालखंडात नगर-मनमाड हा राज्यमार्ग हा दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा एक महत्त्वाचा महामार्ग आहे.या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड व हलकी वाहने ये-जा करत असतात. या नगर-मनमाड महामार्गावर निमगाव बाह्य वळण मार्गापासून सावळीविहीर ते कोपरगाव पर्यंत या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत.या रस्त्याला खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हे समजणे अवघड बनले आहे.जड वाहतूक व इतर प्रवासी वाहनधारकांना य या रस्त्याने वाहन चालवणे मोठे कठीण जात आहे.या खड्ड्यांमुळे अनेकदा अवजड वाहने पलटी होत आहेत.तसेच अनेक जड वाहनांचे टायर फुटत आहेत.छोटे-मोठे अपघात नेहमीच होताना दिसत आहेत.या अपघातांमध्ये अनेक व्यक्ती आत्तापर्यंत जखमी झाले आहेत.काहींना आपला जीव गमवावा लागला आहे.नुकत्याच एका अपघातात सावळीविहीरचे माजी सरपंच बाळासाहेब कसबे यांना आपला प्राण गमवावा लागला आहे.नगर-मनमाड महामार्गावर सावळीविहीर फाटा येथे नाशिक,मुंबई,गुजरात आदी भागातून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहने व जड वाहतूक या रस्त्याला लागत असते.नगर-मनमाड रस्त्यावर पुणतांबा फाटा,जंगली महाराज आश्रमानजीक,सावळीवीहिरच्या पुढे बाह्यवळण मार्ग आहे.येथेही मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.तसेच शिर्डी येथे श्री साईबाबांचे अांतरराष्ट्रीय तीर्थस्थान आहे.त्यामुळे सध्या साईमंदिर बंद असल्यामुळे वाहनांची संख्या जरी कमी असली तरी भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा रस्ता आणखी पुढे धोकादायक होऊ शकतो.सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे खड्डे आणखीन खोल होत चालले आहेत.पुणतांबा चौफुलीवर तर खड्यात एखादा डंपर मुरूम बसू शकतो.पाऊस आला तर या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी भरते.त्यामुळे रस्त्याला खड्डे दिसून येत नाही.आणि त्यामुळे आणखी अपघात वाढतात.काही दिवसांपूर्वी हे खड्डे माती मिश्रित मुरुमाने भरले होते. मात्र हे निकृष्ट काम झाल्यामुळे पावसाने ते परत जैसे थे झाले आहेत.त्यामुळे नगर मनमाड हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा. या नगर-मनमाड महामार्गावरील कोपरगाव ते सावळीविहीर, निमगाव दरम्यान असणारे मोठमोठे खड्डे त्वरित चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने भरून हा रस्ता चांगला करावा.अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close