कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात काल २४ रुग्ण वाढुन २३ रुग्णांचे निधन झाले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण १८ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्याचे अहवाल आज हाती आले असून त्यात ०७ जण बाधित आढळले आहे.तर १९ संशयित रुग्णांना घरी सोडून दिले आहे.नगर येथे तपासणीसाठी ४६ संशयितांचे अहवाल पाठवले आहे. तर खाजगी प्रयोग शाळेतील अहवालात ०७ बाधित निष्पन्न झाले असून एकूण बाधित १४ रुग्ण आढळले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.आज रुग्ण वाढ कमी झाली असली तरी दोन दिवसात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा २७ हजार ५९१ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ४०६ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील २३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काही दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांसह एक आरोग्य कर्मचाऱ्यास आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.त्यामुळे नागरिकांची चिंता वाढत चालली आहे.
आज आलेल्या यादीत शहरात बाधित रुग्णांची संख्या ०८ तर ग्रामीण भागात ०६ असे १४ रुग्ण बाधित निघाले असून यात खाजगी प्रयोग शाळेतील ०७ असे १४ बाधित रुग्ण असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज कोपरगाव शहरात आढळलेल्या उर्वरित बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे भगवती कॉलनी पुरुष वय-३९,महिला वय-६२,इंदिरानगर पुरुष वय-४१,६५,महिला वय-१६,सराफ बाजार महिला वय-१३,बागुल वस्ती महिला वय-४३,गरिमानगर पुरुष वय-४४ आदि असे एकूण ०८ बाधित रुग्ण आढळले आहे.
तर ग्रामीण भागात घोयेगाव पुरुष वय-५९,रवंदे पुरुष वय-५०,मढी खुर्द पुरुष वय-३८, देर्डे-चांदवड पुरुष वय-३४, कोळपेवाडी पुरुष वय-३१,मुर्शतपुर महिला वय-६५ आदी ०६ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १२०० इतकी झाली आहे.त्यात १०२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत २३ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.९१ टक्के आहे.आतापर्यंत ०५ हजार १२३ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला २० हजार ४९२ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २३.४२ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १०७५ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८९.५८ टक्के झाला आहे.दरम्यान या आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे.