जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

काळ्या पैशावर जमिनी घेऊन पैसे कमावणाऱ्यांनी टिका करू नये-वहाडणे

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

पराग संधान तुम्ही कोल्हेंच्या काळ्या पैशाची देखरेख करायची आणि त्याच पैशावर हायवेच्या कडेला कमी भावात जमीन खरेदी करून त्याच जमिनी शासनाला चार पट भावात विकनार आहे.एवढाच उद्योग धंदा तुम्ही प्रामाणिक पणे करता,तुम्ही फक्त तोच करा जनतेने तुम्हाला नाकारलेले आहे.विकासाच्या गप्पा तुमच्या तोंडून शोभत नाही अशी कठोर टीका कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतीच केली आहे.

कोपरगाव शिवसेनेतील हा आमच्या कुटुंबातील अंतर्गत वाद आहे.तो आम्ही सामोपचाराने सोडवू. शहर विकासाच्या कामात खोडा घालण्याचे काम शहराबाहेरील शक्तीचे आहे.कोणताही पक्ष,समाज,कुटुंब यापेक्षा शहर महत्वाचे आहे.भ्रष्टाचाराचा वास येत असेल तर तो बाहेर काढा मात्र शहराच्या विकासाला विरोध करू नका-राजेंद्र झावरे,माजी नगराध्यक्ष.

कोपरगाव नगरपरिषदेने नुकतीच शहरातील सुमारे एकतीस रस्त्यांची कामे मंजुरीसह जवळपास एकोणतीस विषय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती त्यात भाजप कोल्हे गटाने शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांच्या मंजुरीसाठी आधी स्थायी व नंतर सर्वसाधारण सभेत खोडा घातल्याने वादंग निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी हा वाहाडणे यांच्यावर टीका करणाऱ्या पराग संधान यांच्यावर हा प्रतिहल्ला चढवला आहे.

याविषयी अधिक बोलतांना वहाडणे म्हणाले की,” संधान तुम्ही व कोल्हेंनी शेतकऱ्यांची यशवंत पोल्ट्री खाल्ली,नगर पालिकेच्या येसगाव येथील साठवण तलावातील पाणी चोरी केली व भ्रष्टाचार करून समृद्धी महामार्गाला जमिनी विकून अमाप पैसे कमावले आहे. तर बालबुद्धि असलेले उपनगराध्यक्ष यांनी आरोप केले की नगराध्यक्ष निष्क्रिय आहेत त्याना मी सांगू इच्छितो की, चार वर्षाच्या काळात १८कोटींपैकी ११ कोटींची कामे ही भाजप नगरसेवकांच्या वार्डात केली आहे.जरा शरम वाटू द्या.आणि यात ९० टक्के काम करणारे ठेकेदार हे कोल्हे गटाचेच आहे.केवळ वहाडणेंना २८ कामांचे श्रेय मिळू नये म्हणून तुमच्या सह कोल्हेंचे भाट असलेले भाजपचे नगरसेवक नेत्यातला खुष करण्यासाठीच शहराच्या विकास कामाला विरोध केला आहे.हे पण सांगतो तुम्हाला कोणाकडून व कशी चौकशी करायची असेल त्या चौकशीला मी समर्थ आहे.तुमचे अनेक नगरसेवक खासगीत सांगता की तुम्ही आमचे सर्व कामे केली आहे मात्र आम्हाला कोल्हेंचा आदेश ऐकावा लागतो .कोल्हेंचे स्वीयसहाय्यक आमच्यावर पाळद ठेवतात.म्हणून आम्हाला तुमच्यावर सर्वसाधारण सभेत खोटे नाटे आरोप करावे लागतात.एवढी लाचारी स्वीकारणाऱ्यांनी माझ्या विषयी बोलतांना मी निष्क्रिय आहे असे बोलतांना आपल्या अंतर्मनाला प्रश्न विचारावा उत्तर आपल्यालाच मिळेल.
या अगोदरही जीवन प्राधिकरणा मार्फत कामे झाली तेव्हा ते चालले मग आत्ताच प्राधिकरण नको हा अट्टाहास कशाला.ररस्त्यांच्या काममध्ये जेवढे काम झाले तेवढेच पैसे ठेकेदाराला या अगोदरही दिले आहे व यापुढेही देणार आहे ज्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक ची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बसवणार आहे.मात्र यांनी खोटी पत्रके वाटून रस्त्यांच्या कामा विषयी यांनी चुकीची माहिती जनतेत पसरवली आहे.
८४ लाखाच्या गटारी काम तुमच्या जवळच्या नगरसेवकांच्या ठेकेदाराला मिळणार होते म्हणून तुम्ही त्या ८४ लाखाच्या गटारीचा उल्लेख पत्रकात केला नाही मात्र ज्या वेळी हे टेंडर आपल्याला मिळत नसल्याचे पाहून त्यांचा आपण मोठा आगडोंब केला यावरून तुमची भूमिका किती दुटप्पी आहे हे सर्वांना कळले आहे.माजी आमदार कोल्हे यांचा पराभव शहरातील संत सातभाई व ह.भ.प. कैलास जाधव हे अजून विसरलेले नाही.आणि ते माझ्यावर आरोप करत म्हणत आहे की शहरात ४७० खोका शॉप होतील.मात्र सातभाई स्वतः नगराध्यक्ष असतांना झोपलेले होते का ? ज्या नेत्यांना विस्थापितांविषयी तुम्ही आत्ता बोलू राहिले मात्र त्यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे ह्या आमदार होत्या,नगराध्यक्ष तुमचा होता,तत्कालीन महिला मुख्याधिकारी तुमच्या,राज्य व देशात सत्ता तुमची होती.मग तेव्हा विस्थापितांचा कळवळा आपल्याला का आला नाही.तरी देखील आता आपण लवकरच विस्थापित यांना घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन तो प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे.फक्त विकास कामांचे उदघाटन करायची घाई कोल्हे यांना झाली होती जरा सिन्नर व संगमनेर चे बस स्थानकात किती गाळे निघाले व तेथील लोकांचा प्रश्न मिटला मात्र तुम्ही कोपरगाव च्या बसस्थानकात मुद्द्यांम राजकारण करून गाळे बांधले नाही.आणि आता विस्थापितांचा खोटा कळवळा दाखवत आहे.
तुमच्याच लोकांनी अतिक्रमणे करून त्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या सामान्य नागरिकांकडून हप्ते वसुली करत आहे.तुमचेच भाजपचे नगरसेवक मला सांगतात की पहिल्यांदा स्वीकृत नगरसेवक कैलास जाधव यांचे अतिक्रमणे काढा.तुमच्याच गटबाजी मुळे शहर विकासाला खीळ बसली आहे असे वहाडणे शेवटी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close