आरोग्य
कोपरगावात रुग्णवाढ थांबण्याची चिन्हे दिसेना
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात काल ३३ रुग्ण वाढीचा उच्चान्क वाढला असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण १११ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ३५ रुग्ण बाधित निघाले असून ६८ संशयित रुग्णांना घरी सोडून दिले आहे.नगर येथे तपासणीसाठी ०० संशयितांचे अहवाल पाठवलें आहे.पैकी नगर येथून आलेले ११ बाधित तर खाजगी प्रयोग शाळेतील अहवालात ०१ बाधित असे एकूण बाधितांची संख्या ४७ निष्पन्न झाली आहे.तर सर्व तपासण्यात तर ७६ जण निरंक निघाल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा २४ हजार ०११ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ३४६ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काही दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.त्यामुळे नागरिकांची चिंता वाढत चालली आहे.
आज आलेल्या यादीत शहरात बाधित रुग्णांची संख्या १५ तर ग्रामीण भागात ०८ असे तेवीस रुग्ण बाधित निघाले असून दोन खाजगी प्रयोग शाळेतील असे २५ बाधित रुग्ण असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज आढळलेल्या बाधित रुग्णांची शहरातील यादी पुढील प्रमाणे साई सिटी महिला वय-३६,व १२,गजानन नगर पुरुष वय-४७,२०,४५,१७ महिला वय-७२,४०,५५,४०,३५,महादेवनगर पुरुष वय-४९,१९,५७, महिला वय-३४,२०,५५,येवला रोड पुरुष वय-१७,श्रद्धानगरी पुरुष वय-३४,लक्ष्मीनगर पुरुष वय-५८,महिला वय-२२,विवेकानंदनगर पुरुष वय-५४,बिरोबा चौक पुरुष वय-६३,साईनगर पुरुष वय-३३,कोर्ट रोड पुरुष वय-५९,पांडे गल्ली पुरुष वय-१२,०९,निवारा महिला वय-५३,आदींचा समावेश आहे.
तर ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण जेऊर कुंभारी महिला वय-५५, चासनळी पुरुष वय-४०,३५,महिला वय-४५,४०,३५,कोकमठाण महिला वय-५०,७५, संवत्सर पुरुष वय-६५,शिंगणापूर पुरुष वय-६५,४९,करंजी पुरुष वय-३२,मुर्शतपुर महिला वय-३२ आदींचा समावेश आहे.
तर उशिराने नगरवरून आलेल्या रुग्णांत श्रद्धानगरी दोन महिला वय-७६,४६,धारणगाव रोड दोन पुरुष वय-२८,१८,तर एक महिला वय-५५,गांधीनगर येथील पुरुष रुग्ण वय-५५ वर्ष आदींचा समावेश आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १०५१ इतकी झाली आहे.त्यात १५७ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत १८ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७१ टक्के आहे.आतापर्यंत ०४ हजार ६७६ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १८ हजार ७०४ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २२.४७ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ८७६ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८३.३४ टक्के झाला आहे.दरम्यान या आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे.