आरोग्य
कोपरगाव तालुक्यात कोरोनाने माजी सरपंचाचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात सलग चार दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व आजपर्यंत १४ रुग्णांचे निधन झाले असताना आज पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच यमुनाबाई लक्ष्मणराव निखाडे (वय-६४) यांचे कोरोनाने निधन झाले असून त्यांच्यावर नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.त्यांच्या पाच्छात दोन मुले,तीन मुली,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०७ हजार ०४१ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा ३४ लाख ६८ हजार २७२ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ६० हजार ७५० वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ०७ लाख ४७ हजार ९९५ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २३ हजार ७७५ वर जाऊन पोहचला आहे.कोपरगावात निखाडे यांच्यासह आता मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या १६ झाली आहे.