आरोग्य
कोविड-१९ केंद्राचा सर्व भार कोपरगाव नगरपरिषदेवर
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोना विषाणूची साथ जोरात सुरु असून या साथीत सर्व बाधित रुग्णावर कोपरगाव येथिल महाविद्यालयातील वसतिगृहात उपचार केले जात असून या उपचार केंद्रात काही सेवांचा अपवाद शहरासह तालुक्यातील रुग्णांच्या सर्व सेवा सुविधांचा भार कोपरगाव नगरपरिषद पुरवीत असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे.
दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयाच्या कोरोना केंद्रात भरती केलेले रुग्ण तथा माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक यांचेशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांनी,”या ठिकाणी नगरपरिषेचे अध्यक्ष विजय वहाडणे वारंवार फोन करून येथे पुरविण्यात येत असलेल्या सुविधांचा आढावा घेऊन कायम काळजी वाहत असून आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौन्दर,आरोग्य अधिकारी सुनील आरणे व त्यांचे आरोग्य कर्मचारी हे चांगली सुविधा देत असून तीन वेळा आरोग्य तपासणी करत आहे.सकाळी व सायंकाळी चहा,नाश्ता,दुपारी दीडच्या सुमारास जेवण,शुद्ध पिण्याचे पाणी दिले जात असून त्याचा दर्जा चांगला आहे.या ठिकाणच्या केंद्रात स्वच्छता चांगली असून या ठिणांनी या सुविधा देणारे डॉक्टर व कर्मचारी जोखीम घेऊन चांगल्या सुविधा देत असून त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडे” असल्याचे गौरोवोद्गार काढले आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १७ हजार २९२ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत २४४ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत चार दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.आज आलेल्या यादीत शहरात १७ तर ग्रामीण भागात १० असे २७ रुग्ण बाधित निघाले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे जनता टाळेबंदीची मागणी चांगलीच जोर धरू लागली असताना प्रशासनाने काल चार दिवसासाठी टाळेबंदीची घोषणा केली आहे.या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने या कोविड केंद्रात बाधित नागरिकांना कोणत्या सेवा सुविधा दिल्या जातात याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता हि माहिती प्राप्त झाली आहे.
सदर प्रसंगी पुढे बोलताना मुख्याधिकारी सरोदे म्हणाले की,”या केंद्रात या बाधित रुग्णांवर १० वैद्यकीय अधिकारी व १० आरोग्य कर्मचारी या रुग्णांची सेवा करत आहेत.कोपरगाव ग्रामीण रुग्णालयासह व तालुका वैद्यकीय अधिकारी त्यावर लक्ष ठेऊन आहेत.तेथे भरती होणाऱ्या रुग्णांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असून खाटांची सुविधा निर्माण केलेली आहे.त्या साठी आ.आशुतोष काळे हे विविध उपचार साहित्य व प्रातिबंधात्मक साहित्य कोविड केंद्राला देत आहे.पालिका रुग्णांना पाण्याचे वाटर मशीन व ३ टँकर द्वारे पाणी पुरविण्यात येते.सकाळी ८ व दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांना चहा,तर सकाळी उद्योजक राजेश ठोळे यांच्या मार्फत सकाळी १० वाजेच्या सुमारास भाजी,पोळी,भात,वरण आदी पदार्थांचे जेवण पुरविण्यात येत आहे.तर सायंकाळचे जेवण संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने पुरविण्यात येत आहे.या रुग्णांना नगरपरिषदेचे कर्मचारी थेट रुग्णांच्या संपर्कात येऊन त्यांना जेवण,चहा,त्यांच्या खोलीची साफसफाई.निधन झालेल्या रुग्णांचा स्मशान भूमीत अंत्यविधी आदी जोखमीची कौतुकास्पद कामे नगरपरिषदेचे कर्मचारी करत आहे.तर गंभीर रुग्णांना आत्मा मलिक येथील किंवा अति गंभीर रुग्णांना नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे रवाना करण्याची कामे या केंद्रा मार्फत करण्यात येत आहे.काही रुग्णांना या सुविधेपेक्षा खाजगी सुविधेचा लाभ हवा असेल तर त्यानां तशी संमती घेऊन ना हरकत देऊन रवाना करण्यात येते.त्याची जोखीम त्या रुग्णांच्या नातेवाईकावर असते.बाहेरील तालुके,जिल्हे आदी ठिकाणी जरी शहर व तालुक्यातील रुग्ण भरती केले असले तरी एक अँपच्या सहाय्याने त्याची नोंद त्या-त्या तालुक्याच्या एका ठिकाणी करण्यात येत असल्याने त्या नावनोंदणीत सुसूत्रता येत आहे.या आजारी रुग्णांना एक सामूहिक स्वच्छतागृह वापरण्यात येत आहे.त्याची वेळोवेळी विविध फवारण्या करून स्वच्छता करण्यात येते.भरती असलेल्या खोलीतही त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.रुग्णांची घरी सोडतेवेळी त्यांची सर्व चादरी,कपडे बदलण्यात येतात.त्यांची स्वच्छता करण्यात येत आहे.कालांतराने या बाधित रुग्णांत या साथीचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित होत असल्याचा दावाही शेवटी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी शेवटी केला आहे.
दरम्यान दुसऱ्या एका रुग्णाने नाव न सांगण्याच्या अटीवर,”या ठिकाणी पाठक यांनी सांगितलेल्या सेवा सुविधांचा पुनरुच्चार करून रुग्ण सोडण्याच्या वेळीही पुन्हा तपासणी करून अहवाल निरंक आल्यावरच घरी सोडणे आवश्यक” असल्याचे मत व्यक्त केले आहे.